Join us  

'कहो ना प्यार हैं' गाण्याच्या शूटिंगच्या ठिकाणी अधिपती आणि मास्तरीण बाईंनी केलं शूटिंग, हृषिकेश म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 1:50 PM

Tula Shikvin Changalach Dhada : सध्या सोशल मीडियावर अधिपती- मास्तरीण बाई उर्फ अक्षराचा थायलंड मधला 'कहो ना प्यार हैं' गाण्याचा प्रोमो चर्चेत आला आहे. जो थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर शूट केला गेला आहे. कारण अधिपती-अक्षरा हनिमूनसाठी थायलंडला पोहचले आहेत. तिथला अनुभव नुकताच अभिनेत्याने शेअर केला आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) मालिकेतील कलाकार थायलंडला पोहचले आहेत. तिथेले आकर्षक समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थचा आस्वाद घेताना दिसणार आहेत तुमचे लाडके अक्षरा- अधिपती. सध्या सोशल मीडियावर अधिपती-अक्षराचा थायलंड मधला 'कहो ना प्यार हैं' गाण्याचा प्रोमो चर्चेत आला आहे. जो थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर शूट केला गेला आहे. कारण अधिपती-अक्षरा हनिमूनसाठी थायलंडला पोहचले आहेत. तिथला अनुभव नुकताच अभिनेत्याने शेअर केला आहे.

हृषिकेश शेलारने अनुभव आणि आनंद व्यक्त करताना सांगितले की,"माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली.  मुंबई मध्ये आमची  किमान ५०-६० जणांची टीम असते पण थायलंडला आम्ही १५-१६ जणच होतो तिथे शूटिंगच सगळं सांभाळायला आणि ती एक वेगळीच तारे वरची कसरत होती. नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणे, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड काम होत पण त्यात खूप मज्जा आली. आमची टीम, निर्माते, चॅनल, सर्वच इतके सपोर्टिव्ह आहेत की सगळं छानपणे पार पडलं. 

तो पुढे म्हणाला की, तुम्ही अधिपती-अक्षरावर चित्रित झालेलं जे गाणं पाहत आहात ते आम्ही एका आयलंडवर शूट केले. तिथे आमच्यकडे खूप कमी वेळ होता आणि त्यात आम्हाला गाणंही शूट करायच होत आणि सीन सुद्धा करायचा होता. ह्याच आयलंडवर 'कहो ना प्यार हैं'च्या ओरिजिनल गाण्याचं चित्रीकरण झालंय. त्याच ठिकाणी आम्ही ही ते गाणं पुन्हा रीक्रिएट केलं खूप भन्नाट अनुभव होता. पण ते चित्रीकरण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले कारण आमच्या हातात एकचं दिवस होता. त्यात ही जोरदार पाऊस आला मध्यंतरी आम्ही बोटचा प्रवास करून त्या आयलंडवर पोहचलो शूटसाठी सुरुवात केली आणि पाऊस कोसळायला लागला आम्हाला शूट थांबवावं लागलं. असाही ही प्रश्न पडला की आम्हाला परत जात येईल का इथून. खूप पाऊस होता तिथे. जवळपास २ तासांनी पाऊस थांबला आणि आम्ही गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली. खूपच छान अनुभव होता.

टॅग्स :झी मराठी