पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. मालिकेच्या पहिल्या भागापासून रसिक या मालिकेला खिळून होते. आता मालिकेत ७ वर्षाचा लिप पिरअड येणार आहे. ७ वर्षानंतरची कथा आता मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत आधी बालकलाकार अदिती जलतरेने अहिल्याबाई होळकर यांच्या बालपणाची भूमिका साकारली. अदितीने या साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
मुळात या भूमिकेसाठी अदितीला तब्बल 1000 मुलींशी स्पर्धा करावी लागली होती. या भूमिकेसाठी 1 हजार मुलींनी ऑडिशन दिली होती. त्यामध्ये अदितीची निवड करण्यात आली होती. या मालिकेत अदितीसोबतच, राजेश श्रृंगारपुरे, स्नेहलता वसईकर, क्रिश चौहान, सुखदा खांडकेकर, भाग्यश्री, आर्यन प्रीत या कलाकारांच्या भूमिका होत्या.
आता मालिकेत ७ वर्षानंतरचा काळ दाखवण्यात येणार म्हटल्यावर कथानकाच्या बदलानुसार नवीन कलाकार आता झळकणार आहे. अदितीने साकारलेली अहिल्याबाई होळकरची तरुणपणातली भूमिका एतशा संझगिरी साकारणार आहे. मालिकेचे प्रोमोही छोट्या पडद्यावर झळकु लागले आहेत.
याविषयी एतशाने सांगितले की, अहिल्यादेवींची भूमिका साकारणं अतिशय आव्हानात्मक आहे, भारतीय इतिहासातील एक अत्यंत महान महिला शासक असलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा वारसा प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य मानते. पुण्यश्लोक अहिल्याबाई ही सध्या टेलिव्हिजनवरची रसिकांची अत्यंत लाडकी मालिका आहे आणि याचे श्रेय त्यातील उत्कृष्ट अभिनय आणि दमदार कथानकाला जाते.
मला आशा आहे की, या प्रेरणामूर्ती असलेल्या स्त्रीचे चरित्र पडद्यावर उलगडून दाखवण्यात मी यशस्वी होईन आणि रसिक माझ्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा असाच वर्षाव करत राहतील. ही नवीन वाटचाल सुरू करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. खरोखर, माझे जणू स्वप्नच साकार झाले आहे.
मालिकेत अदितीला अहिल्याच्या भूमिकेत आजपर्यंत रसिकांने पाहिले आता एतशा संझगिरी अहिल्या बनत रसिकांच्या भेटीला येणार म्हटल्यावर रसिकही उत्सुक आहेत. तर दुसरीकडे किंशुक वैद्य हा अभिनेता खंडेराव होळकरच्या भूमिकेत झळकणार आहे.
क्रिश चौहान या बालकलाकाराने लहानपणीच्या खंडेराव होळकर यांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता तरुण खंडेराव यांची भूमिकेसाठी किंंशुक वैद्यही प्रचंड मेहनत घेत आहे. शाका लाका बूम-बूम या मालिकेत किंशुकने भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियताही मिळाली होती.