अतुल परचुरे यांना आवडतो हा खेळ, आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधीही नाही सोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 5:42 AM
'जागो मोहन प्यारे' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री श्रृती ...
'जागो मोहन प्यारे' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री श्रृती मराठे आणि सुप्रिया पाठारे यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे. या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावते आहे. श्रृतीने साकारलेली भानू आणि अतुल परचुरे यांनी साकारलेल्या मोहन या भूमिका रसिकांना भावतायत. नुकतंच या मालिकेत क्रिकेटचा सामना रंगला. सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहौल पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या मालिकेत क्रिकेटचा सामना चांगलाच रंगतदार ठरला. पाठारे क्रिकेट लीग अंतर्गत रंगलेल्या या सामन्यामध्ये मालिकेतील कलाकारांनी बरीच धम्माल केली. नेहमी आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या कलाकारांनी यावेळी आपल्यातील क्रिकेटचं कौशल्य दाखवून दिलं. यावेळी साऱ्यांच्या नजरा अभिनेता अतुल परचुरे यांच्यावर लागलेले होते. मालिकेत मोहन ही भूमिका साकारणारे अतुल परचुरे यांनी ही क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला. मात्र यावेळी क्रिकेट येत नसलेला आणि वेंधळा मोहन अतुल परचुरे यांना साकारायचा होता. रिल लाइफमध्ये क्रिकेट येत नसल्याचे अतुल परचुरे यांना दाखवायचं असलं तरी रिअल लाइफमध्ये ते क्रिकेटवेडे आहेत. शिवाजी पार्क परिसरात जन्म आणि बालपण गेले असल्याने त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे ते उत्तम क्रिकेट खेळतात. शिवाजी पार्कमध्ये त्यांनी अनेक क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यांना खरं तर क्रिकेटरच बनायचे होते, मात्र ते अभिनय क्षेत्रात आलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आनंद घ्यायलाही त्यांना आवडतं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्यांनी भारताचे क्रिकेट सामने पाहिले आहेत. त्यामुळे क्रिकेट उत्तम खेळत असूनही ते पाठारे क्रिकेट लीगमध्ये क्रिकेट येत नसल्याचे दाखवणे अतुल परचुरे यांच्यासाठी आव्हानात्मक होतं.cnxoldfiles/a>सेटवर काम करताना अपवादानेच या कलाकारांना वेळ मिळतो. एखादा सीन करताना वेळ मिळाला तर सेटवरच ही सेलिब्रिटी मंडळी या ना त्या पद्धतीने एन्जॉय करतात. कधी सेलिब्रिटी एखादा खेळ करतात तर कधी सेटवरच गप्पांचा फड रंगतो. क्रिकेट हा तमाम भारतीयांचा आवडता खेळ. वेळ मिळेल तिथे जागा बनवून भारतीय क्रिकेट खेळण्यासाठी मार्ग शोधून काढतात.