Join us

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या निवड प्रक्रीयेवर प्रेक्षक नाराज; विजेत्या स्पर्धकाला मिळाली इतकी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 12:47 PM

सारेगमप लिटिल चॅम्पस या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. गौरी गोसावी ही या शोची विजेती ठरली आहे.

सारेगमप लिटिल चॅम्पस (Sa Re Ga Ma Pa Lil Champs)या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. महाअंतिम सोहळ्यात टॉपचे ५ स्पर्धक म्हणून पलाक्षी दीक्षित, गौरी गोसावी, ओंकार कानिटकर, स्वरा जोशी आणि सारंग भालके यांनी बाजी मारली होती. गौरी गोसावी (Gauri Gosavi) ही या शोची विजेती ठरली आहे. तिला १ लाखांचे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट देण्यात आले आहे. तर ओंकार कानेटकर आणि सारंग भालके हे उपविजेते ठरले आहेत. उपविजेते ठरलेले ओंकार आणि सारंग या दोन्ही स्पर्धकांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आले आहे. तर या शोमध्ये सेकंड रनर अप स्वरा जोशी ठरली आहे. 

महाअंतिम फेरीत मुंबईच्या गौरी गोसावीने बाजी मारली आहे. ती एक उत्कृष्ट गायिका असल्याचे स्वतः उषा मंगेशकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. तिच्या गाण्यात लता दिदींची छबी पाहायला मिळते असं मत त्यांनी व्यक्त करून गौरीचं विशेष कौतुक केले होते. मात्र या विजेत्या क्रमांकावरून प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे.

प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

अंतिम पाच स्पर्धक ठरलेले असताना स्वरा जोशी आणि रीत नारंग यांना संधी देण्यात आली होती. त्यातून स्वरा जोशीने अंतिम फेरीत स्वतःचे नाव नोंदवले मात्र रीत नारंग ही देखील, अतिशय उत्तम गाणे गात होती तिला अंतिम पाचमध्ये निवडले जावे अशी अपेक्षा प्रेक्षकांनी केली होती. तर प्रज्योत गुंडाळे याला देखील या शोमधून बाजूला काढले गेले असे अनेकांचं म्हणणे आहे. रीत नारंग आणि प्रज्योत हे दोघेही अंतिम फेरीसाठी पात्र होते. त्यांनी अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अमराठी असूनही रितने मराठी भाषिक गाणी अगदी सुरेख गायली होती. त्यामुळे रीतची निवड अंतिम फेरीत करण्यात यावी अशी मागणी तिच्या चाहत्यांनी केली होती. तर प्रज्योतला देखील मुद्दामहून डावलण्यात आले असा नाराजीचा सूर सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आयोजक आणि पाचही परिक्षकांविरोधात केलेला पाहायला मिळतो आहे. अंतिम सोहळ्यासाठी ५ स्पर्धकांची परीक्षकांनी केलेली निवड ही चुकीची आहे असेही प्रेक्षक म्हणत आहेत. 

टॅग्स :सा रे ग म प