Join us  

‘मग्न तळ्याकाठी’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2016 1:45 PM

जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित ‘मग्न तळ्याकाठी’ हे मराठी नाटक चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहेत. या नाटकाचे लिखाण महेश एलकुंचवार ...

जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित ‘मग्न तळ्याकाठी’ हे मराठी नाटक चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहेत. या नाटकाचे लिखाण महेश एलकुंचवार यांनी केले आहे तर याची निर्मिती दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी केली आहे. 

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘मग्न तळ्याकाठी’  या नाटकाचा आज १४ मे रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे दुपारी ४ वाजता शुभारंभचा प्रयोग आहे.  वाडा चिरेबंदी या नाटकाचा दुसरा भाग मग्न तळ्याकाठी’ हे नाटक आहे.  यामध्ये निवेदिता सराफ, चिन्मय मांडलेकर, सिध्दार्थ चांदेकर, भारती पाटील, नेहा जोशी, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, दीपक कदम, राजश्री ठाकूर, वैभव मांगले आणि प्रसाद ओक अशा मेहनती कलाकारांचा अभिनय आहे.