कॉमेडियन कपिल शर्माने इंडिगो एअरलाइन्सबाबत संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. पायलट ट्राफिकमध्ये अडकल्याने फ्लाईटला उशीर झाला. त्यामुळे प्रवासी वैतागले होते. कपिल शर्माने याचा व्हिडिओ शेअर करत एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्याने इंडिगो एअरलाइन्सवर संताप व्यक्त केला आहे.
कपिल शर्माचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं आहे. त्याच्या या ट्वीटवर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्डिड वॉर्नरने कमेंट केली आहे. "हे खूपच वाईट आहे. माझ्या काही मित्रांनाही असाच अनुभव आला आहे," असं डेव्हिडने कमेंटमध्ये म्हटलं आहे. कपिल शर्माने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.
कपिल शर्माने ट्वीटमध्ये काय म्हटलं?
'प्रिय Indigo6E, आधी तर तुम्ही प्रवाशांना सुरुवातीला बसमध्ये तासभर वाट पाहायला लावली आणि नंतर तुमची टीम म्हणते की पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. काय? खरंच? ८ वाजता फ्लाईट टेक ऑफ व्हायला हवी होती आता ९.२० झाले आहेत. तरी पायलट कॉकपिटमध्ये आलेला नाही. हे १८० प्रवासी परत कधी इंडिगो फ्लाईटने प्रवास करतील असं वाटतं का? कधीच नाही.#shameless'