Join us

बेबीमून मोमेंट्स: कॅनाडामध्ये पत्नी गिन्नीसह असा एन्जॉय करतोय कपिल शर्मा, See Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 11:15 AM

गिन्नी बऱ्याचदा 'द कपिल शर्मा' शोच्या सेटवर उपस्थित असते आणि तिथे कपिलची काळजीदेखील ती घेत असते. आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती सेटवर येत असते.

कपिल शर्मा पत्नी गिन्नी चथरथसह कॅनाडामध्ये बेबीमून एन्जॉय करत आहे. गिन्नी प्रग्नंट असल्यामुळे सध्या कपिल त्याचा पूर्ण वेळ पत्नी गिन्नीला देत आहे. नुकतेच गिन्नीने इंस्टाग्राम अकाउंट गिन्नीसोबतच एक फोटो शेअर केला. या फोटोत दोघेही कॅनाडाच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसतायेत.कपिलच्या या फोटोला आतापर्यंत  7 लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. कपिलने हा फोटो नुस्ताच शेअर केला नाही तर, त्याला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.कपिल 25 जुलैपासून कनाडामध्ये आहे. लवरकच तो भारतात परतणार आहे. त्याच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. 

गिन्नी बऱ्याचदा 'द कपिल शर्मा' शोच्या सेटवर उपस्थित असते आणि तिथे कपिलची काळजीदेखील ती घेत असते. आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती सेटवर येत असते. तिच्या कुटुंबियांना वाटते की, कपिलने जालंदरमध्ये गिन्नीसोबत राहावे. इतकेच नाही तर त्याच्या आईला देखील गिन्नीसोबत प्रेग्नेंचीच्या काळात रहायचे आहे.  

कपिल शर्माने आपल्या बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत डिसेंबर, २०१८मध्ये लग्न केले. या विवाह सोहळाला टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण दिले होते. आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. किस किसको प्यार करूं या चित्रपटातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो फिरंगी या चित्रपटातही पहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही.

२००७ साली कॉमेडी रिएलिटी शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर' चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले. 

टॅग्स :कपिल शर्मा