एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 10:08 AM2023-03-18T10:08:14+5:302023-03-18T10:10:24+5:30

'बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅनचे विविध शहरात लाईव्ह कॉन्सर्ट सुरु आहेत.

Bajrang Dal create chaos in bigg boss winner MC Stan live show watch viral video | एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय

एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय

googlenewsNext

'बिग बॉस १६' (Bigg Boss 16) चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) याची लोकप्रियता प्रचंड आहे. मात्र नुकतेच एम सी स्टॅनला एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. इंदुरमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स सुरु असताना बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रॅपरला धमकी दिली. यामुळे एमसी स्टॅनला शो अर्ध्यातच सोडून जावे लागले. या प्रकारामुळे एमसी स्टॅनचे चाहते नाराज झाले. त्याला पाठिंबा म्हणून ट्विटरवर PUBLIC STAND WITH MC STAN ट्रेंड होत आहे. '

'बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅनचे विविध शहरात लाईव्ह कॉन्सर्ट सुरु आहेत. काल १७ मार्च रोजी इंदुरमध्ये त्याचा लाईव्ह शो सुरु होता. याच वेळी बजरंग दलचे कार्यकर्ते तिथे आणि हंगामा केला. एमसी स्टॅनच्या गाण्यांमध्ये उघडपणे शिव्या आणि महिलांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख असतो. तसेच एमसी स्टॅन अंमली पदार्थांचं समर्थन करत असून याचा तरुणाईवर वाईट परिणाम होतो. या कारणांमुळे बजरंग दलाचा एमसी स्टॅनला विरोध आहे.

एमसी स्टॅनचे चाहते ट्विटरवर त्याला पाठिंबा देत आहेत. बजरंग दलाचे कार्यकर्ते स्टेजवर आलेच कसे सुरक्षारक्षकांनी कसे अडवले नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.भारतात कलाकारांचा आदरच केला जात नाही अशीही टीका होत आहे. एका व्हिडिओत बजरंग दलाचे कार्यकर्ते धमकी देताना दिसत आहेत. मात्र चाहत्यांनी रॅपरला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. 

रॅपर एमसी स्टॅनचा आज नागपुरमध्ये शो आहे. यानंतर ४० दिवसांनी २८ एप्रिल रोजी अहमदाबाद येथे त्याचा शो आहे. २९ ला जयपुर, ६ मे रोजी कोलकाता आणि ७ मे रोजी दिल्ली येथे त्याचे लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. 

Web Title: Bajrang Dal create chaos in bigg boss winner MC Stan live show watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.