Join us

'बालिका वधु' फेम अविका गैरने वजन कमी केल्यावर शेअर केला बिकनीमधला फोटो, दिसतेय ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 13:43 IST

अविकाने बरेच वजन कमी केले आहे.

टेलिव्हिजनवरील मालिका 'बालिका वधु'मधील आनंदीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अविका गैर गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. अविकाने बरेच वजन कमी केले आहे .अविका गौरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक बिकिनीतला फोटो शेअर केला आहे.

ब्लू रंगाच्या बिकिनीमध्ये अविका स्विमिंग पूलच्या बाजूला रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय. या फोटोमध्ये अविकाचा झालेला मेकओव्हर तुम्हाला आकर्षित करेल. तिच्या नव्या लूकवर चर्चा होत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे अविकाच्या टोंड फिगरने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. विविध अंदाजातील तिचे फोटो पाहायला मिळतात.

अविकाने जवळपास 13 किलो वजन कमी केलं आहे. 'बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

टॅग्स :अविका गौर