Join us  

'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' फेम सुमित पूसावळे पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?; होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 7:00 AM

'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (Balu Mamachya Navane Changbhale) मालिकेत बाळूमामांची भूमिका अभिनेता सुमित पूसावळे (Sumeet Pusawale)ने साकारली आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (Balu Mamachya Navane Changbhale) ही मालिका जवळपास तीन वर्षाहून अधिक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बाळूमामांची भूमिका अभिनेता सुमित पूसावळे(Sumeet Pusawale)ने साकारली आहे. या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही त्याने प्रमुख नायक म्हणून साकारलेली पहिलीच मालिका आहे. या मालिकेअगोदर सुमितने झी मराठीवरील लागिरं झालं जी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

सुमित पूसावळे हा मूळचा दिघंजी गावचा. शालेय शिक्षणानंतर सुमित पुण्यात आला. इथे त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आणि काही काळ याच क्षेत्रात नोकरी केली. त्याला स्वतःचे रेस्टॉरंट उभारायचे होते. मात्र लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्याच्यात कलेची आवड निर्माण झाली. मुंबईला गेल्यावर त्याला हिंदी चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. सरगम या चित्रपटातून तो झळकला होता. त्यानंतर लागीरं झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून तो लाइमलाइटमध्ये आला. सुमित पुसावळेने नुकतेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्याने आपल्या खास मैत्रिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावरून तो प्रेमात पडला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. सुमितची ही खास मैत्रीण आहे दिशा परदेशी. 

दिशा परदेशी ही मराठी मालिका अभिनेत्री आहे. तिने काही ज्वेलरी आणि साड्यांच्या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केले आहे. २०१६ साली इंडियन हेअर अँड ब्युटी या सौंदर्य स्पर्धेत तिने सहभाग दर्शवला होता. हा किताब तिने त्यावेळी पटकावला होता. स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत दिशा परदेशी हिने निहारिकाचे पात्र साकारले आहे. निहारिका हे पात्र मालिकेत विरोधी भूमिका दर्शवत आहे. या मालिकेव्यतिरिक्त दिशाने टीव्ही जाहिरात क्षेत्रात देखील मॉडेलिंगचे काम केले आहे. 

टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलंकलर्स मराठी