Sana Makbul : 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) ची ट्रॉफी अभिनेत्री सना मकबूलने (Sana Makbul) आपल्या नावे केली. सगळीकडे सध्या सना आणि तिचा बॉयफ्रेंड श्रीकांतचीच चर्चा पाहायला मिळतेय. आता सना लवकरच लग्न (Sana Makbul Marriage) करणार असल्याचं बोललं जात आहे. लग्न कधी करणार याबद्दल खुद्द तिच्या बॉयफ्रेंडनेचं खुलासा केला आहे.
'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरात असताना सना रिलेशनशिपमध्ये असल्याचा उल्लेख करताना दिसली होती. बिग बॉसने फिनालेच्या काही दिवस आधी घरामध्ये आयोजित केलेल्या पार्टीत तिनं लग्नाचे संकेतही दिले होते. फिनालेनंतर बिग बॉसच्या सेटमधून बाहेर आल्यावर सना तिच्या बॉयफ्रेंडला भेटली. यावेळी पापाराझींनी लग्नाबद्दल विचारले असता सनाचा बॉयफ्रेंड हसला आणि म्हणाला, "ते होईल, हळूहळू सर्वांना कळेल". दोन महिन्यांत लग्न करणार का, असे विचारल्यावर श्रीकांत म्हणाला, "दोन महिन्यांत काही होणार नाही. थोडा वेळ लागेल, पण होईल".
सनाचा बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेदी हा एक बिझनेसमॅन आहे. श्रीकांत बडीलोनचा फाऊंडर असल्याचं म्हटलं जातंय. ही एक मोठी पर्सनल लोन देणारी कंपनी आहे. सना मकबूल या कंपनीची ब्रॅंड एम्बेसेडर असल्याचं म्हटलं जातंय. सनाच्या ब्रथडे पार्टीला तोही उपस्थित होता. दोघांचे फोटो पाहून ते कन्फर्म एकमेकांना डेट करत असतील असं म्हटलं जातंय.