Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या सीझनमध्ये कोणाकडेच माणुसकी नाही कारण..'; सोनाली पाटीलचा राग अनावर, स्पर्धकांना घेतलं फैलावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:55 IST

काल बिग बॉसने सांगूनही अभिजीतला मदत करायला कोणीच पुढे आलं नाही, या गोष्टीवर सोनाली पाटीलने निशाणा साधलाय (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या घरात काल 'पाताळलोक' हा टास्क झाला. या टास्कमध्ये दोन टीम पाडल्या गेल्या होत्या. एका टीममध्ये अभिजीत-निक्की, धनंजय-वैभव, घनःश्याम-पॅडी, अशा टीम होत्या. त्यापैकी जेव्हा अभिजीत-निक्कीची जोडी पुढे आली तेव्हा बिग बॉसने अभिजीतला वॉर्निंग दिली. अभिजीतच्या पायाला आधीच दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी दुसऱ्या स्पर्धकाने खेळावं, असं बिग बॉसने सांगितलं. पण कोणीच खेळायला पुढे आली नाही. सर्वांनी अभिजीतची पार्टनर निक्कीला यामुळे दोष दिला. या प्रसंगामुळे बिग बॉस मराठी ३ ची स्पर्धक आणि अभिनेत्री सोनाली पाटीलने सर्वांवर राग व्यक्त केला.

सोनाली इतरांवर का रागावली?

सोनाली पाटीलने सोशल मीडियावर व्हिडीओ बनवत सांगितलं की, "तुम्ही टास्क खेळताय तर खेळा. अभिजीत दादाच्या पायाला इजा आहे हे दहावेळा बिग बॉस सांगतोय. अभिजीतच्या ऐवजी निक्की खेळू शकते, याची बिग बॉस परवानगी देत आहेत . पण निक्कीला नाही खेळायचंय, तिला अंधाराची भीती वाटते. ओके फाईन. तेव्हा बसलेल्या लोकांपैकी कोणीतरी अभिजीतच्या जागी खेळावं ही परमिशन बिग बॉसने देऊनही कोणाचंच धाडस झालं नाही पुढे येऊन खेळायचं."

सोनाली पुढे म्हणाली, "अभिजीतदादा! निक्की कशी का असेना आम्ही तिला हेट करतो पण आम्हाला तुझ्याबद्दल जास्त प्रेम आहे. आतमध्ये गुडघ्यावर चालायचं असल्याने तुझ्या पायाला पुढे आणखी इजा झाली असती. पण त्यावेळी अभिजीतच्या जागी खेळायला सगळेच नाही म्हणत होते. तुम्हाला अभिजीतदादावरचं प्रेम दाखवायचंय की निक्कीला नमवायचं आहे. जर तुम्हाला अभिजीतदादाबद्दल प्रेम दाखवायचं असतं तर तुम्ही स्वतःहून पुढे आले असते खेळायला.  म्हणजे तुम्हाला अभिजीतदादाच्या इजेपेक्षा निक्कीला नमवण्याची गोष्ट मोठी वाटतेय. फायनली कोणीही पुढे गेलं नाही खेळायला. या सीझनमध्ये माणुसकी कोणीही दाखवत नाही. माणुसकी कोणी दाखवत असेल तर तो फक्त अभिजीतदादा."

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठी