Join us

Be Alert! मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसऱ्यांदा फेसबुक पेज झालं हॅक, इंस्टावर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 17:20 IST

गेल्या काही दिवसांत अकाऊंट हॅकिंगच्या घटना वाढल्या असून अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजश्री प्रधान होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून घराघरात पोहचली आणि या भूमिकेतून तिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. तेजश्री सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. नुकतंच तिने तिच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरील अकाउंटच्या माध्यमातून तिचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचं सांगून अलर्ट केलं आहे. 

तेजश्रीने प्रधाननं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने तिचे अधिकृत निळ्या रंगाची टीक असलेलं अकाऊंट दुसऱ्यांदा हॅक झालं आहे. जर या पेजवर काही पोस्ट केलं असेल तर मी केलेलं नाही. मी हॅकरच्या विरोधात कारवाई करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे.  

गेल्या वेळी जेव्हा तेजश्रीचं फेसबुक पेज हॅक झालं होतं. त्यावेळी तिने ट्विटरवर सांगितलं की, “निळी खूण असलेलं माझं फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झालं आहे. या अकाऊंटद्वारे काही पोस्ट करण्यात आले असेल तर ते मी केलेलं नाही. संबंधित हॅकरविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे” अशी पोस्ट तेजश्रीने केली आहे.

गेल्या काही दिवसांत अकाऊंट हॅकिंगच्या घटना वाढल्या असून तेजश्रीप्रमाणे अनेक सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अशा हॅकर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. तेजश्री प्रधान 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे.

विविध चित्रपटातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. विविध नाटकात तेजश्रीने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :तेजश्री प्रधान अग्गंबाई सासूबाईफेसबुक