Join us

​ जाणून घ्या बिग बॉस मराठीमधील भूषण कडू आणि पुष्कर जोगच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या या गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 4:32 AM

वूटवरील बिग बॉस मराठी-अनसीन अनदेखाच्या नव्या क्लिप्समध्ये भूषण कडूने एक विनोदी आठवण सांगितली आहे. तो त्याच्या कुटुंबियांना कोकणातील एका ...

वूटवरील बिग बॉस मराठी-अनसीन अनदेखाच्या नव्या क्लिप्समध्ये भूषण कडूने एक विनोदी आठवण सांगितली आहे. तो त्याच्या कुटुंबियांना कोकणातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेला होता. आज आपल्या मेहनतीने आणि कामाने भूषण आज मराठी लोकांच्या घराघरात ओळखला जातो. पण त्याला या रेस्टॉरंटमध्ये एक वेगळाच अनुभव आला. याविषयी भूषणने सुशांतला सांगितले, मी माझ्या कुटुंबियांना घेऊन हॉटेलमध्ये गेलो, तर त्या हॉटेलच्या मालकाने माझे इतकं विचित्र पद्धतीने कौतुक केलं की, मला स्वत:च्या पर्सनॅलिटीवरच शंका आली. इतकंच नाही सगळ्या कुटुंबियांच्या जेवणाचाही बट्ट्याबोळ झाला. या मालकाने आपल्या मुलाची माझी ओळख करून देण्यासाठी त्याला बोलावलं. पण ही ओळख फारच गमतीशीर पद्धतीने करून देण्यात आली. त्याच्या मुलाने माझ्याकडे पाहावं, कारण मी स्टार असलो तरी माझे वागणं बोलणं इतकंच नाही तर माझी पर्सनॅलिटी सेलिब्रिटीसारखी वाटत नाही, असं तो म्हणाला. या वाक्याने माझ्या कुटुंबियांना हसूच फुटलं. वूटवरील बिग बॉस मराठी-अनसीन अनदेखाच्या नव्या क्लिपमध्ये पुष्करने त्याचा असा एक अनुभव सांगितला... जो अनुभव तो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. पुष्कर विशीत असताना त्याने एक लो बजेट सिनेमा केला होता. पण या सिनेमाची पटकथा फारच छान होती. श्रीनगर आणि उत्तर भारताच्या काही भागांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण होणार होते. एके दिवशी, चित्रीकरण संपवून पुष्कर शहरापासून काहीशा लांबच्या भागात असलेल्या राहण्याच्या जागेकडे असिस्टंटसोबत जात होता. पण तिथे पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की, सिनेमाचा संपूर्ण क्रू अचानक गायब झालेला. ते कुठे निघून गेले, काय झाले त्याचा काहीच त्याला थांगपत्ता लागत नव्हता. काही तरी भयानक तिथे घडत असल्याची चाहूल त्याला लागत होती. त्या हॉटेलात आता तो एकटाच उरला होता. अतिशय अस्वस्थ अशा मनःस्थितीत त्याने वडिलांना फोन केला. त्यावर त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले, मिळेल त्या विमानाने पुण्याला निघून ये... सुदैवाने, पुण्याला जाणाऱ्या एका कनेक्टिंग फ्लाइटमध्ये एक शेवटची सीट रिकामी होती. अशा हादरवून टाकणाऱ्या प्रसंगांमुळे तुम्ही आयुष्याबद्दल नव्यानेच विचार करायला लागता. आजवर इतका भयानक प्रसंग कधीही अनुभवला नसल्याचे त्याने सांगितले.Also Read : आता हा प्रसिद्ध गायक करणार बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री