'भाबीजी घर पर है'मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी नेहा पेंडसेने महिलांना एक कानमंत्र दिला आहे. आजघडीला महिलाही घरात न राहता बाहेर पडली आहे. चार पैसे कमावण्याची क्षमता तिच्यातही आहे. प्रत्येक स्त्री आज मेहनत करत आलेल्या परिस्थितीचा खंबीरपणे सामोरे जात आहे.
जगभरात महामारी पसरली तेव्हा जगभरातील सर्व महिलांनी स्थिती स्वत:च्या हातामध्ये घेतली. व्यावसायिक जीवनापासून घरामध्ये संतुलन राखण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवले. असे कोणतेच काम नाही, जे त्यांनी केले नाही आणि ते काम अधिक उत्तमरित्या केले. माझ्या मते, लैंगिक असमानतेचा परिणाम कमी झाला आहे. विशेषत: मेट्रो शहरांमधील महिला एकमेकींना पाठिंबा देण्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. काळ व स्थितीसह जगाला समजले आहे की, महिला कमकुवत नसून पुरूषांइतक्याच समान आहेत.
अनिता भाभी ही समकालीन व आजच्या काळातील महिला आहे. ती एक प्रेरणास्रोत आहे, कारण ती स्वत:चा विचार करते आणि स्वत:च्या जीवनाकडे लक्ष देते. अनिता भाभी धाडसी आहे आणि विश्वास असलेल्या गोष्टीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. ती सहजपणे हताश होत नाही. प्रेक्षक तिच्या या गुणांची प्रशंसा करतात. प्रेक्षक, विशेषत: महिला प्रेक्षक तिच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. ती हुशार महिला आहे आणि मला तिचे हे गुण खूप आवडतात. हेच अनिता व माझ्यामध्ये साम्य आहे. प्रेक्षक अशा प्रबळ महिलांकडे त्वरित आकर्षित होण्यासोबत त्यांची प्रशंसा व कौतुक देखील करतात.
मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, आवाज उठवणे आणि स्वत:चे विचार व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा स्वार्थीपणा नाही, तर आपला विश्वास असलेल्या गोष्टीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि ते कार्य पूर्ण केले पाहिजे. नेहमी डोळे व कान उघडे ठेवा, जागरूक राहा आणि तुम्ही कोण आहात व जीवनामध्ये काय पाहिजे हे व्यक्त करा. स्वावलंबी बना आणि नेहमी स्वत:चे ऐका!