Join us

'रंग माझा वेगळा' मालिकेत रंगणार सौंदर्य स्पर्धा, दीपादेखील होणार सहभागी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 1:27 PM

Rang Maza Vegla:'​​रंग माझा वेगळा'मध्ये येत्या काही दिवसात रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ​'​रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मध्ये येत्या काही दिवसात रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत. दीपा आता इंटरनॅशनल फेअरनेस क्रीमची मॉडेल बनणार आहे. हा ट्विस्ट येण्याअगोदर तिला काही अडथळे पार करावे लागणार आहेत. याच स्पर्धेत जाऊन श्वेताला देखील मॉडेल व्हायची इच्छा आहे. आपल्या कंपनीच्या न्यू प्रॉडक्ट्सची मला मॉडेल बनायचे आहे, हे ती सौंदर्याला सांगते. सौंदर्या तिला तू ऑडिशन दे जर तुला यात सिलेक्ट केले तर माझं काहीही म्हणणे नाही. 

दुसरीकडे दीपा आणि साक्षी ऑफिसमध्ये त्यांच्या डाएट फुडच्या संदर्भातील कामासाठी येतात. या सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा असलेल्या काही तरुणी ऑफिसमध्ये आलेल्या असतात. दीपाला पाहून या सर्वजणी हसू लागतात आणि तुला ऑडिशन द्यायची असेल तर आमच्या मागे नंबर लाव असे सांगतात. साक्षीला त्या मुलींचा राग येतो आणि दिपाच्या नकळत ती या ऑडिशनसाठी दिपाच्या नावाने फॉर्म भरते. काही वेळाने श्वेता तिथे दाखल होते आणि या फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत मीच मॉडेल बनणार असे सगळ्यांना सांगते. इतकेच नाही तर ऑडिशनसाठी आलेल्या मुलींना ती तिथून हाकलून लावते. दिपाही निघून जाण्याच्या तयारीत असताना श्वेता तिला थांबवते आणि तू या स्पर्धेसाठी फॉर्म भरला आहेस ना असे विचारते.

दीपा घेईल का सौंदर्य स्पर्धेत भाग?

त्यावेळी दिपा गोंधळून जाते मी फक्त डाएट फूड बद्दल विचारायला इथे आले होते असे म्हणते. तेव्हा श्वेता तिला तिच्या रंगावरून हिणवते. श्वेताचे हे बोलणे ऐकून साक्षी पुढे येते आणि मीच दिपाचा फॉर्म भरला असे सांगते. मात्र श्वेता सगळ्यांचे फॉर्म बाजूला काढून तिचाच फॉर्म ऑडिशनसाठी द्यायला सांगते. त्यामुळे आदित्य आणि सौंदर्या दीपाला या सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार करतील का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह