`बीचवाले – बापू देख रहा है’ ही नवी मालिका सोनी सबवर सादर करण्यात येणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय लोकांच्या आकांक्षा आणि मूल्य यामधली घुसमट या बीचवाले मालिकेत दाखवण्यात आली आहे. ही कथा `बॉबी बीचवाले’ या पात्राभोवती गुंफलेली आहे, झाहीर हुसैन यांनी ही भूमिका साकारली असून, ते दिल्लीमधील एकत्र कुटुंबात राहणारे प्रमुख पात्र आहे. गरिष्मा व्हिजनचे अश्वनी धीर यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेली 'बीचवाले – बापू देख रहा है' ही एका मध्यमवर्गीय भारतीयाची कथा आहे, जो त्याची तत्त्वे व आकांक्षांमध्ये अडकला आहे. त्याचे मोठे घर, फॅन्सी कार असण्यासोबतच परदेशी ट्रिप्सचा आनंद घेण्याचे स्वप्न आहे. पण त्याच्या कमी पगारामुळे तो आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. ही कथा मालिकेतील प्रमुख नायक झाकीर हुसैनद्वारे साकारण्यात येणारी भूमिका बॉबी बीचवालेच्या अवतीभोवती फिरते. बॉबीच्या परिवारामध्ये त्याचे ७० वर्षांचे वडिल (मिथलेश चतुर्वेदी) आणि ९२ वर्षांचे दादाजी (जगदीश कवाल) आहेत. दादाजींना 'बापूजी' म्हणून ओळखले जाते. दादाजी हे महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्यसेनानी होते आणि नेहमी स्वत:ला समस्याजनक स्थितींमध्ये ओढावून घेतात. म्हणूनच त्यांना 'बीचवाले' अशी उपाधी देण्यात आली आहे. ते हे नाव आनंदाने स्वीकारतात. बॉबी स्पेअर पार्ट्सचे दुकान व गॅरेज चालवतो. कुटुंबातील मोठा मुलगा असल्यामुळे तो त्याच्या कुटुंबाची काळजी करतो. तो दुस-याला न दुखवता स्वत:च्या जीवनात जलदपणे बदल घडवून आणण्यासाठी काही जुगाड करतो. बॉबीची पत्नी अनन्या खरेद्वारे साकारण्यात येणारी भूमिका चंचल बीचवाले ही चंचल मनाची व्यक्ती आहे. ती नेहमीच मर्यादेपेक्षा अधिक मागणी करते आणि ईएमआयवर वस्तू खरेदी करते आणि तिच्या पतीकडे हट्ट करत वस्तू खरेदी करते.
बॉबीचा लहान भाऊ मनोज गोयलद्वारे साकारण्यात येणारी भूमिका पप्पी बीचवाले हा सेल्स एक्झिक्युटिव्ह असून तत्त्वाने गांधीवादी आहे. पप्पीची पत्नी अंकिता शर्माद्वारे साकारण्यात येणारी भूमिका शीतल बीचवाले ही प्रभुत्व गाजवणारी, आधुनिक काळातील महिला आहे आणि तिला घरातील कामे करण्याचा आळस आहे. मालिकेच्या प्रमुख पात्रांमध्ये इतर कलाकारांचा देखील भरणा आहे जसे चंचल आई रिटा (शुभांगी गोखले) आणि चंचलचा जुगाडू भाऊ राजू (राजीव पांडे). गतकाळाप्रमाणेच बीचवाले कुटुंब 'बापूजी'कडे त्यांच्या समस्यांचे निराकरण विचारतात.