Join us

Behind The Scene डॉक्टर डॉनच्या सेटवरही रंगली लकी अलीच्या गाण्यांची मैफिल, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 13:18 IST

लकी अली चा हा व्हिडिओ गोव्याच्या Arambol Beach वरील आहे. अनेक तरूण-तरूणी लकी अली भोवती फेर धरून बसले आहेत आणि लकी अली गिटार हातात घेऊन आपल्याच तंद्रीत गातोय

बॉलिवूडमध्ये अनेक गायक गायिका प्रसिद्धीच्या झोतात येतात. त्यांच्यातल्या टॅलेंटमुळे त्यांना गायनाच्या चित्रपटसृष्टीत ब-याच ऑफर मिळतात. मात्र काही हिट गाणी दिल्यानंतर हे गायक गायिका अचानक गायब होतात. कालांतराने सिनेमात त्यांच्या सूरांची जादू दिसत नाही. बॉलिवूडमध्ये अनेक जण खूप लोकप्रिय झालेत आणि मग अचानक दिसेनासे झालेत. या यादीतले एक नाव म्हणजे, गायक लकी अली.

होय, लकी अलीची वेगळी ओळख देण्याचे कारण नाही. कारण लकी हा कॉमेडीचा बादशाह मेहमूदचा मुलगा आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. लकी एक गायक आहे तसाच एक चांगला अभिनेताही आहे. ‘कांटे’ या चित्रपटात त्याचा अभिनय आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पण त्यानंतर लकी इंडस्ट्रीतून जणू गायब झाला. सध्या लकी अलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

लकी अली चा हा व्हिडिओ गोव्याच्या Arambol Beach वरील आहे. अनेक तरूण-तरूणी लकी अली भोवती फेर धरून बसले आहेत आणि लकी अली गिटार हातात घेऊन आपल्याच तंद्रीत गातोय. ‘जाये तो...’अशी ओळ म्हणून तो थांबतो आणि यानंतर त्याला फेर धरून बसलेले सगळेजण पुढच्या ओळी गाताना दिसतात. लकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट होतोय.

लकी अली या सुप्रसिद्ध गायकाची गाणी सदाबहार आहेत. ती गाणी ऐकून सगळ्यांना मंत्रमुग्ध व्हायला होतं. याच गाण्याची भुरळ  'डॉक्टर डॉन' मालिकेच्या कलाकारांनाही पडली आहे.  या मालिकेच्या सेटवर कलाकार ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन देखील खूप धमाल करत असतात. नुकतंच या मालिकेच्या सेटवरील बिहाइंड द सिन व्हिडीओ देवदत्तने शेअर केला आहे ज्यात मालिकेच्या शूटींगदरम्यान ब्रेकटाईममध्ये देवदत्त त्याचे छंद जोपासताना दिसतोय. 

देवदत्त गिटारवर लकी अलीचं गाणं वाजवतोय आणि सर्व कलाकारांची मैफिल जमली आहे. बाकीचे कलाकार त्याच्या गाण्याला साथ देत आहेत तर देवा गिटार वाजवून माहोल बनवतोय. उत्तम अभिनय कौशल्यासोबत देवदत्त म्युजिकमध्ये देखील निपुण आहे. तो अनेक वाद्य वाजवू शकतो. 'डॉक्टर डॉन'च्या सेटवर जमलेल्या या मैफिलीचा प्रेक्षक आणि चाहते देखील पुरेपूर आनंद घेत आहेत.देवदत्तच्या चाहत्यांनाही त्याचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. गायक लकी अलीसाठी देवदत्तने हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये देवदत्त लिहीतो की, "तुमच्यावर प्रेम आहे लकी अली.. दीर्घ आयुष्य जगा." 

टॅग्स :देवदत्त नागेलकी अली