Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; पुढील तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 14:57 IST

Pallavi dey: रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं.

बंगाली कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पल्लवी डे (pallavi dey) हिचा मृत्यू झाला आहे. पल्लवीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. आज (१५ मे) सकाळी पल्लवीचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर बंगाली कलाविश्वावर एकच शोककळा पसरली असून पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

पल्लवीने तिच्या राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. घटनास्थळावर पोलिस पोहोचले त्यावेळी पल्लवी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं.

दरम्यान, सध्या पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पल्लवीच्या मृत्यूमागील खरं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

कोण आहे पल्लवी डे?

पल्लवीच्या मृत्यूमुळे बंगाली कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. पल्लवी बंगाली कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तिची ‘Mon Mane Na’ या मालिकेतील भूमिका विशेष गाजली होती.. तसंच तिला ‘Resham Jhanpi’ या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन