Join us

'ह.म.बने तु.म.बने' मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 11:58 AM

'ह.म.बने तु.म.बने' या मालिकेद्वारे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन स्त्रियांच्या भिन्नदृष्टीकोनवर आधारित तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातले नाट्य हलक्या फुलक्या नर्मविनोदी शैलीत मांडले आहे.

ठळक मुद्देतीन-तीन स्त्रियांच्या भिन्न दृष्टीकोनवर आधारित 'ह.म.बने तु.म.बने' मालिका

आजच्या काळाशी सुसंगत आणि नवनवीन विषय हाताळण्यात येणाऱ्या सोनी मराठी चॅनेलवरील निरनिराळ्या आशयघन मालिकांमुळे सध्या सोनी मराठी सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. ग्रँड ओपनिंग आणि एका पेक्षा एक उत्तम मालिका यांमुळे फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनी मराठीच्या 'ह.म.बने तु.म.बने' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

आजवर अनेक वाहिन्यांनी सासू-सुनेच नाते विविध पैलूंद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सोनी मराठीने 'ह.म.बने तु.म.बने' या मालिकेद्वारे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन स्त्रियांच्या भिन्न दृष्टीकोनवर आधारित तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातले नाट्य हलक्या फुलक्या नर्मविनोदी शैलीत मांडले आहे. करमणुकीसाठीचा हा विषय निवडून सोनी मराठी प्रेक्षकांना एक नवीन दृष्टिकोन देत, मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा रुजू करत आहे. सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवरून आजकाल प्रेक्षक व चॅनेल यांमधील अंतर कमी होऊन प्रेक्षक आपली मते, आपली आवड निवड डायरेक्ट चॅनल, तसेच कलाकारांपर्यंत पोहोचविण्यास खूप प्राधान्य देत असल्याचे 'ह.म.बने तु.म.बने' मालिकेला सोशल मीडियावर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून लक्षात येते.आदिती सारंगधर, राणी गुणाजी, प्रदीप वेलणकर, उज्वला जोग, सचिन देशपांडे, अजिंक्य जोशी, यांसारख्या मात्त्तबर कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या आणि केदार आगास्कर, सखी दातार, पूर्वी शाह या बच्चे कंपनीने आणलेल्या धमाल मस्तीमुळे या मालिकेला मिळालेल्या प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादांमुळे 'ह.म.बनेतु.म.बने' मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतं असल्याचे दिसून येते आहे.'ह.म.बनेतु.म.बने' ही मालिका दिग्दर्शन सचिन गोखले करत असूनही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करू लागली आहे. या मालिकेतील आणखीन गमती जमती आणि मनोरंजन अनुभवण्यासाठी 'ह.म.बने तु.म.बने' पाहत रहा.