'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या एक्स पती पियुष पुरे यांचं निधन झालं आहे. शनिवारी(१९ एप्रिल) त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या काही काळापासून ते लिव्हरच्या आजाराने ग्रस्त होते. पण, या आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झालं. शुभांगीने त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे.
Ex पतीच्या निधनामुळे शुभांगीला धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत या कठीण काळात समजून घेण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याबरोबरच याविषयी भावना व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचंही तिने म्हटलं आहे. शुभांगीने लेक आशीलादेखील याबाबत माहिती दिली आहे.
शुभांगी आणि पियुषने २००३ साली लग्न केलं होतं. लग्नानंतर २२ वर्ष त्यांनी सुखाचा संसार केला. पण, त्यानंतर काही कारणांमुळे त्यांनी घटस्फोट घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मुलीसाठी सुरुवातीला त्यांनी घटस्फोट घ्यायचा नाही असं ठरवलं होतं. मात्र, अखेर नात्यात दुरावा आल्याने अखेर फेब्रुवारी २०२५मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. शुभांगीशी घटस्फोट घेतल्यानंतर अडीच महिन्यांतच पियुषचं निधन झालं आहे.