Shubhangi Atre Divorce With Husband: टीव्हीवरील हिट शो भाभीजी घर पर है (Bhabi Ji Ghar Par Hai)२०१५ मध्ये सुरू झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या शो ने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. या शोमधील अंगूरी भाभी अर्थात शुभांगी अत्रे(Shubhangi Atre) प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.सध्या शुभांगीच्या तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आली आहे. ‘भाबीजी घर पर हैं’ फेम शुभांगी अत्रे लग्नाच्या 19 वर्षांनंतर पती पीयूष पुरीपासून विभक्त झाली आहे. या बातमीन ही ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला.
अलीकडेच अभिनेत्रीने याला दुजोरा दिला असून तुटलेल्या लग्नाबद्दल तिची व्यथा मांडली आहे. शुभांगी अत्रे आणि पियुष गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत होते. त्याला एक मुलगी देखील आहे, तिचे वय 18 वर्षे आहे.शुभांगीने एका मुलाखतीत सांगितले की, “आम्ही एक वर्ष एकत्र राहत नाही. पियुष आणि मी आमचे लग्न शेवटपर्यंत वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. परस्पर आदर, विश्वास आणि मैत्री हा मजबूत लग्नाचा पाया आहे.
शुभांगी पुढे म्हणाली की, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक समस्या होत्या, ज्या ते सोडवू शकले नाहीत. अभिनेत्री म्हणाली, “आम्हाला समजले की आम्ही आमचे मतभेद सोडवू शकत नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांना स्पेस देण्याचे ठरवले आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले. माझं कुटुंब हे माझं पहिले प्राधान्य होते आणि आमचं कुटुंब आमच्या सभोवताली असावे अशी आमची इच्छा आहे, परंतु काही झालेलं नुकसान तुम्ही भरुन नाही काढू शकत.
शुभांगी आणि पियुषचा प्रेमविवाह झाला होता. घरच्यांपासून लपून दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केलं होतं. मात्र, नंतर पियुषसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने तिची कुटुंबाशी ओळख करून दिली.