Deepesh Bhan Prayer Meet: ‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेत मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भानच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. दीपेशचं कुटुंब, मित्रमंडळी, सहकलाकार सगळ्यांना अद्यापही विश्वास बसत नाहीये. 41 वर्षांचा अभिनेता दीपेश भान क्रिकेट खेळत असताना कोसळला आणि बे्रन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी दीपेशची प्रेअर मीट झाली. यावेळी सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेत. ‘भाभीजी घर पर हैं’ची अंगूरी भाभी तर ढसाढसा रडली.
दीपेश भानच्या प्रेअर मीटमध्ये रोहिताश्व गौर, वैभव माथुर, किकू शारदा, विदिशा श्रीवास्तव, निर्मल सोनी यांच्यासह अनेक टीव्ही कलाकार हजर होते. किकू शारदाने दीपेशसोबत ‘एफआयआर’ या शोमध्ये काम केलं होतं. ‘भाभीजी घर पर हैं’मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) यावेळी ढसाढसा रडताना दिसली. विरल भयानीने तिचा व्हिडीओ शेअर केलाआहे.
गेल्या 23 जुलैला दीपेश भान जग सोडून गेला. 10 दिवसांआधीच त्याने फुल बॉडी चेकअप केलं होतं. त्याला कुठलीही आरोग्यविषयक तक्रार नव्हती. फिटनेससाठी तो रोज वर्कआऊट करायचा.
दीपेशला ‘भाभीजी घर पर हैं’ मधून प्रसिद्धी मिळाली पण त्याआधीही त्याने अनेक विनोदी मालिकांमध्ये काम केलं होतं. भूतवाला सीरियल, एफआयआर, कॉमेडी का किंग कौन, कॉमेडी क्लब, चॅम्प आणि सुन यार चिल मार या मालिकांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. फालतू उटपटांग चटपटी कहानी या बॉलिवूड चित्रपटातही तो दिसला होता. आमिर खानसोबत एका जाहिरातीतही त्याने काम केलं होतं.