स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्व कलाकार घराघरात पोहचले. या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने श्वेताच्या भूमिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, अनघा ही भगरे गुरूजींची कन्या आहे.
अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची लेक आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले. 'रंग माझा वेगळा' ही तिची पहिलीच मालिका असून अनघाने 'अनन्या' या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे.
अनघाने नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबईतून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. 'कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी' आणि 'व्हाट्सएप लग्न' या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून तिने काम सांभाळले होते. याशिवाय काही काळ 'कोठारे व्हिजन'मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता.
पौराणिक कथांवर आधारित असलेल्या आपल्या सणांची माहिती मिळत असल्याने बहुतेक प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. भगरे गुरूजी आपल्या शैलीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे.