Join us

'भाग्य दिले तू मला' मालिकेतील रत्नमाला यांचे संगीतप्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 18:28 IST

Bhagya Dile Tu Mala: 'भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमालाची भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी साकारली आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. कावेरी आणि राजवर्धनमधील वाद असो, छोटी मोठी भांडण असो वा मतभेद असो... पण मालिकेमध्ये अजून एक नातं प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि ते म्हणजे रत्नमाला आणि कावेरी यांचे... रत्नमाला ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या लाडक्या निवेदिता सराफ (Nivedita Saraf) साकारत आहेत. त्यांचा प्रोमो आल्यापासून प्रेक्षक त्यांच्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक होते. 

परंपरेची कास कधीच न सोडलेल्या, त्याचा अभिमान असलेल्या रत्नमाला ज्यांचे खूप मोठे प्रस्थ आहे, मोठ्या उद्योजिका आहेत... ज्यांचा विश्वास आहे जमिनीवर राहून देखील आकाशापर्यंत गवसणी घालता येते. रत्नमाला यांना त्यांचा उद्योगाचा डोलारा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी, राजवर्धनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यासारख्याच संस्कृतीला धरून चालणार्‍या मुलीच्या त्या शोधात आहेत. आणि याचदरम्यान त्यांची आणि कावेरीची भेट होते.

आता मालिकेमध्ये रत्नमाला यांच्या मध्यस्तीने कसे कावेरी आणि राजचे नाते फुलेल ? कावेरीच्या मदतीने राज आणि रत्नमाला कसे जवळ येतील हे बघायला मिळेलच. परंतू हे मालिकेमध्ये सुरु असताना कलाकारांची सेटवर बरीच धम्माल मस्ती सुरू असते. निवेदिता ताईंनी सेटवर सीन सुरू असताना मध्ये मिळालेल्या वेळेमध्ये एक वाद्य वाजवले (पियानो) ज्याचे व्हिडिओ बरेच व्हायरल होत आहेत.

टॅग्स :निवेदिता सराफ