सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. 'इंडियन आयडल मराठी ' हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजय-अतुल यांच्यासारखे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. या आठवड्यात स्पर्धकांची खरी परीक्षा होती. कारण स्पर्धकांना गायचे होते परीक्षकांच्या आवडीचे गाणे! हे आव्हान सगळ्या स्पर्धकांनी अगदी चोख उचलले.
भाग्यश्री टिकले हिला परीक्षकांनी 'जिवलगा' हे अतिशय अवघड गाणी दिले होते आणि या गाण्याला तिनी पुरेपूर न्याय देऊन 'झिंगाट परफॉर्मन्स' मिळवले आहे. स्वतःच्या आवडीचे गाणे निवडून ते सादर करणे तसे सोप्पे असते. पण जेव्हा परीक्षक गाणे देतात, तेव्हा त्या गाण्याला पूर्णपणे न्याय देणे, परीक्षकांच्या अपेक्षांना खरे उतरणे हे जबाबदारीचे काम असते.
गेले अनेक आठवडे भाग्यश्रीला परीक्षांकडून विशेष असे कौतुक मिळाले नव्हते. पण यंदाच्या आठवड्यात मात्र भाग्यश्रीने 'हम भी कुछ कम नही' हे दाखवत दमदार सादरीकरण करून प्रेक्षकांच्या कौतुकावर स्वतःचे नाव कोरले. भाग्यश्री आता हा मिळालेला सूर असाच जपणार का हे बघण्यासाठी पाहा 'इंडियन आयडल मराठी' सोम.-बुध.,रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.