Join us  

"भाई का बर्थडे..." खुशबू तावडेच्या वाढदिवसानिमित्ताने बहीण तितिक्षाची खास पोस्ट, म्हणते, मीच तुझे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 5:02 PM

Khushaboo Tawde And Titiksha Tawde : अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने इंस्टाग्रामवर खुशबूचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे. खुशबू तावडेने आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आज तिचा वाढदिवस असून त्या निमित्ताने तिची बहिण आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने त्यांचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने इंस्टाग्रामवर खुशबूचे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, भाई का बर्थडे. आमच्या कुटुंबातील सर्वात धाडसी व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ती जी धाडस करते आणि करुनच दाखवते! ती सर्व आहे जी लोकांना तिच्याबद्दल माहित नाही! तुमच्या वयात आणखी एक वर्ष आणि आमच्या कुटुंबासाठी आणखी एक वर्ष जोडल्याबद्दल शुभेच्छा! आणि काहीही असो, मी नेहमीच तुझे पहिले मूल राहीन! दिवसेंदिवस माझे तुझ्यावरील प्रेम वाढत आहे! या आहेत अनेक #idgaf कॉफीच्या तारखा. तितिक्षाच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ते पोस्टवर खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

खुशबू आणि तितिक्षा या बहिणींचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. ते त्यांच्या पोस्टमध्ये आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमधून दिसून येते. खुशबू शेवटची सारं काही तिच्यासाठी मालिकेत काम करताना दिसली. तिने ही मालिका प्रेग्नेंसीमुळे सोडली. तिच्या जागी पल्लवी वैद्य हिची वर्णी लागली. ती लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. तिला आणि संग्रामला पहिला मुलगा आहे, ज्याचे नाव राघव आहे. आता ते दोघे दुसऱ्या मुलाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तर तितिक्षाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करताना दिसते आहे. तिने या मालिकेत साकारलेली नेत्रा प्रेक्षकांना खूप भावते आहे.