कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाची टीम भेटीस आली आहे...विनोदाची उत्तम जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल.देशपांडे… ज्यांनी केवळ विनोद निर्मितीच नाही केली तर मराठी भाषेला शब्द संपदेने समृध्द केले... असे आपल्या सगळ्यांचे लाडके पु.ल.देशपांडे यांच्या जीवनप्रवासावर वायाकॉम18 मोशन पिक्चर्स भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे... हा चित्रपट ४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे...याच निमित्ताने अस्सल पाहुणे इरसाल नमुनेच्या मंचावर या चित्रपटाची संपूर्ण टीम आली... यांनी काही प्रश्नांची उत्तरं एकदम बेधडक तर काही उत्तर एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली... या गप्पा चांगल्याच रंगल्या.
या भागामध्ये सचिन खेडेकर यांनी एक कविता सादर केली... तसेच मकरंद अनासपुरे यांनी सचिन खेडेकर यांना एक प्रश्न देखील विचारला कि, आचार्य अत्रे यांचे राजकीय व्यक्तिमत्व संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान उदयास आले... पु.ल.देशपांडे यांनीदेखील राजकीय गोष्टींवर अनेक विधान केली परंतु त्याची दखल घेतली गेली नाही यावर काय सांगाल ? यावर महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, ऋषिकेश जोशी यांनी आपली मत मांडली... यावर ते काय म्हणाले हे बघायला विसरू नका या आठवड्याच्या भागामध्ये...यावेळेस आलेल्या प्रत्येकानेच पु.ल.देशपांडे यांच्याशी निगडीत आठवणी आणि किस्से सांगितले ... सचिन खेडेकर यांनी सांगितले मला अजूनही दूरदर्शनवरील वाऱ्यावरची वरात आणि रविवार सकाळ कार्यक्रम आठवतात...