Join us

जेव्हा कॉमेडी क्वीन भारती सिंगला युरोपमध्ये या गोष्टीमुळे भरावे लागले होते 80,000 रूपयचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 5:15 PM

भारती सिंगला घरी बनविलेल्या खाण्याचा विदेशात सुध्दा आस्वाद घेता येईल. त्याने सांगीतले, “आम्ही इतर देशात प्रवास करत असताना भारतीला स्वतःचे खाणे बरोबर बाळगणे आवडते.

हम तुम और क्वारंटाइन मालिकेमध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया सादर करत असलेल्या गंमतीमध्ये लॉकडाऊनच्या काळात हे जोडपे काय करत आहे हे दाखविले जात आहे. या मालिके मध्ये खूप विनोद आहे, त्यामुळे त्यातील संबंध्दता व विनोदासाठी प्रेक्षकांना ती आवडत आहे. नुकतेच भारती व हर्ष यांना मीरा देवस्थळे (विद्या) शो मध्ये पाहुणी म्हणून मिळाली होती व त्यात ते क्वारंटाइन मधील संकटांविषयी सांगत आहेत शिवाय मनमोकळा संवाद सुध्दा साधत आहेत.

    या संवादाच्यामध्ये, हर्षने त्यांच्या युरोप ट्रिप विषयी गंमतीदार किस्से सांगीतले. हर्षने सांगीतले की, जेव्हा भारतीला बाहेरचे जेवण आवडत नाही, त्यामुळे जेव्हा ते विदेशात प्रवास करत होते, तेव्हा तिने भारतातून स्वयंपाक करण्याच्या काही गोष्टी बरोबर घेतल्या होत्या, म्हणजे तिला घरी बनविलेल्या खाण्याचा विदेशात सुध्दा आस्वाद घेता येईल. त्याने सांगीतले, “आम्ही इतर देशात प्रवास करत असताना भारतीला स्वतःचे खाणे बरोबर बाळगणे आवडते.

जेव्हा आम्ही युरोप मध्ये प्रवास करत होते, तेव्हा तिने बरोबर 8 किलो गव्हाचे पीठ, डाळ आणि तांदूळ घेतले होते. युरोपमध्ये प्रवास करताना, आमच्या जवळच्या सामानाचे वजन जवळपास 40 किलो झाले आणि त्यासाठी आम्हाला जवळपास 80,000 रुपये भरावे लागले!” परंतु, भारतीने यावर लगेच उत्तर दिले की, त्यांनी खूप पैसे वाचविले, त्यांनी जर बाहेर जेवण घेतले असते तर त्यांना यापेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागले असते. पण भारती आणि हर्षची ही ट्रिप खूप अविस्मरणीय झाली, कारण त्यांना युरोपमध्ये सुध्दा गरमागरम पराठे खायला मिळाले. 

टॅग्स :भारती सिंग