कलाकाराचं तासनतास शुटिंग आणि कामाचं दडपण तसंच दगदग यांत स्वतःला फिट ठेवणं हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी मंडळी फिटनेसवर विशेष लक्ष देतात. तासनतास जिममध्ये घालवत किंवा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. या कलाकारांमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव घ्यावे लागेल.रसिकांना खळखळून हसायला लावत त्यांचं तुफान मनोरंजन करणारी कॉमेडी क्वीन भारती सिंह.
भारती सिंहने चाहत्यांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारती तिच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी आणि वेट लॉसमुळे चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्याही नजरा खिळल्या असून सारेच तिचे कौतुक करताना दिसत आहेत. एरव्ही जाडजुड दिसणारी भारती तिच्या दिसण्यावर अनेकदा विनोद करत चाहत्यांना खळखळून हसवायची. पण आता भारती पूर्वीसारखी लठ्ठ दिसत नाही. हो, अगदी खरंय स्वतःवर मेहनत घेत आता ती फॅटपासून फिट बनली आहे. फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग बनली आहे.
सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. तिचा नवीन लूक पाहून चाहते कमेंट्स लाईक्स करत पसंती देत आहेत. व्यायाम आणि योग्य डाएट करत तिने नवीन लूक मिळवला आहे. त्यामुळे आता ती पूर्वीपेक्षाही सुंदर आणि तितकीच आकर्षक दिसत आहे. तिचा हा नवीन लूक पाहून फॅट टू फिट असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार हे मात्र नक्की.
पती हर्ष लिंबाचियासह तिने खास फोटोशूट करत तिचा लूकही चाहत्यांना दाखवला आहे. सगळेच सध्या भारतीचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे या दोघांचे एकत्र फोटो पाहून लाईक्सचा वर्षावही करत आहेत. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर दोघेही कपल गोल देत असतात. एक से बढकर एक पोज शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असतात.