Join us  

​भारती का झाली भावुक ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 1:07 PM

'कॉमेडी नाईट्स ताजा'च्या आगामी भागात जबरदस्त धम्माल पाहायला मिळणार आहे. या शोच्या आगामी भागामध्ये ऑलिम्पिक विजेते हजेरी लावणार आहेत. ...

'कॉमेडी नाईट्स ताजा'च्या आगामी भागात जबरदस्त धम्माल पाहायला मिळणार आहे. या शोच्या आगामी भागामध्ये ऑलिम्पिक विजेते हजेरी लावणार आहेत. या भागाचं चित्रीकरण झाले असून हा भाग लवकरच प्रसारीतही होईल. या शोची प्रमुख सदस्य असलेली कॉमेडीयन भारती सिंहसाठी हा भाग थोडा खास होता. कारण या भागाच्या निमित्ताने भारतीने आपलं बालपणाचे स्वप्न पूर्ण केले आहे. बालपणापासूनच आपल्याला खेळाची आवड होती असे भारतीने सांगितले आहे. खेळामुळेच एका महागड्या शाळेत प्रवेश मिळाल्याची आठवणही भारतीने शेअर केली आहे. त्यावेळी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने खेळालाच शाळा प्रवेशाचे साधन बनवले होते असे भारतीने म्हटले आहे. रायफल शूटिंगमध्ये नाव कमावण्याचे भारतीचे स्वप्न होते. मात्र ते कधीही पूर्ण झाले नसल्याची खंत तिने बोलून दाखवली. मात्र कॉमेडी नाईट्स ताजाच्या ऑलिम्पिक विजेत्यांचा सहभाग असलेल्या भागामुळे भारती भावुक झाली. या शोच्या शुटिंगच्या वेळी भारतीने बरीच धम्माल मस्ती करत प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटला. भारती 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या 4 पर्वाची रनरअप आहे. या कार्यक्रमासाठी तिने साकारलेली लल्ली रसिकांना हसून हसून लोटपोट करण्यास भाग पाडत असल्यामुळे ती सा-यांच्याच पसंतीस पात्र ठरली. त्यानंतर हरहुन्नरी भारतीने काॅमेडी सर्कसच्या पहिल्या भागापासून इतर सिरीजही गाजवल्या. इतकेच नाहीतर तिने 'प्यार में ट्विस्ट' या मालिकेतही तिच्या अभिनय कौशल्या दाखवले होते.त्यानंतर 'सौ साल सिनेमा के' हा शो होस्टही केला. इतकेच नाहीतर 'मास्टर शेफ'चे 6 वे पर्व आणि 'नच बलिए 6'मध्ये तिने कंटेस्टंट म्हणूनही एंट्री मारली होती. अशी काॅमेडी क्विन भारती सिंह सध्या रसिकांच्या मनावर अधिराज्या गाजवत आहे.