Join us

भाऊ कदमचं बालपण गेलं मुंबईतील 'या' ठिकाणी, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 06:30 IST

भाऊने त्याच्या बालपण ज्या ठिकाणी गेलं तिथला फोटो शेअर केला आहे

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर भाऊ कदमने त्याच्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. फू बाई फू या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याला मिळालं आहे. तो सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात तो दर भागात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील त्याचे चाहते झाले आहेत. 

 खऱ्या आयुष्यात भाऊ कदम अत्यंत साधा भोळा आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या भाऊने आपल्या स्वभावातील साधेपणा कधीच सोडला नाही. काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जिथे त्याचं बालपण गेलं, त्या जागेचा फोटो भाऊने पोस्ट केला आहे. भाऊने त्याच्या बालपण ज्या ठिकाणी गेलं तिथला फोटो शेअर करत लिहिलं की, माझे बालपण

भाऊने शेअर केलेला हा फोटो मुंबईतील बीपीटी क्वॉटर्सचा आहे. एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या भाऊचे वडील बीपीटीत नोकरी करत होते. तर आई गृहिणी होत्या. बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरातले सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

वडिलांच्या अकाली निधनानंतर घराची सर्व जबाबदारी भाऊवर पडली. तेव्हा बीपीटीमधील घरसुद्धा सोडावे लागले. वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. उदनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला कारकुनाचेही काम केले होते. भाऊला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कठोर मेहनतीमुळे त्यांना हे यश गवसलं आहे.

भाऊ कदमने टाइमपास, टाइमपास २, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका, नारबाची वाडी, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या