Join us

भाऊ कदमची पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, त्यांच्या फॅमिलीचा फोटो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 1:56 PM

भाऊ कदम (Bhau Kadam)चे खूप फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायची इच्छा त्याच्या चाहत्यांना असते.

चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शो मधून घराघरात पोहचलेला विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam)ने आपल्या टॅलेंटच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. फू बाई फू या कार्यक्रमातून त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याने पटकावले आहे. चला हवा येऊ द्या या शोद्वारे भाऊ प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन करत आहे. यात तो दर भागात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. भाऊ कदमचे खूप फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायची इच्छा त्याच्या चाहत्यांना असते.

भाऊ कदमच्या पत्नीचे नाव ममता असून त्यांचे लव्हमॅरेज आहे. त्यांना चार मुली असून भाऊ नेहमीच आपल्या फॅमिलीचे  फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

भाऊ कदमचे बालपण हे मुंबईतील वडाळातल्या बीपीटी क्वॉर्टर्समध्ये गेलं आहे. त्याचं शालेय शिक्षण देखील वडाळ्याच्याच ज्ञानेश्वर शाळेत झाले. पण त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांना वडाळ्यातील जागा सोडावी लागली. त्यानंतर तो कुटुंबांसोबत डोंबिवलीत राहायला गेला. त्याची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे त्याने बरीच छोटी-मोठी कामे केली. पण अभिनय हे त्याचे पहिले प्रेम होते.

भाऊ कदमने रंगभूमीवरून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.जाऊ तिथे खाऊ हे त्याचे नाटक त्या काळात चांगलेच गाजले होते. या नाटकामुळे त्याच्या करियरला एक दिशा मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. भाऊने टाइमपास, टाइमपास २, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका, नारबाची वाडी, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या