Join us

बिदाई फेम अभिनेत्री सारा खान कोरोना पॉजिटिव, सध्या आहे होम क्वॉरंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 5:45 PM

चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही साराच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाने साराला विश्रांती आणि लवकरच बरी होणार असा विश्वासही दिला आहे.

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. यामध्येच प्रसिद्ध बिदाई फेम अभिनेत्री सारा खानलाही करोनाची लागण झाली आहे.   त्यामुळे सध्या सारा घरीच क्वारंटाइन झाली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

साराने इन्स्टावर पोस्ट करुन ही माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. डॉक्टरांनी मला घरीच क्वॉरंटाईन राहण्यास सांगितले आहे. मी ठीक आहे आणि लवकरच बरी होणार आसा मला विश्वास आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही साराच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाने साराला विश्रांती आणि लवकरच बरी होणार असा विश्वासही दिला आहे. 

साराने करिअरची सुरूवात 2007 मध्ये 'सपना बाबुल का  बिदाई' या मालिकेतून केली होती. यानंतर ती अनेक रिएलिटी शोमध्ये दिसली. साराने 'बिग बॉस 4' मध्येही भाग घेतला होता. सारा सध्या 'संतोषी माँ' या शोमध्ये काम करत आहे. साराने टीव्ही व्यतिरिक्त चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण चित्रपटात तिला पाहिजे तसे यश मिळाले नाही. 

सारा खान सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सारा बर्‍याचदा वादाच्या भोव-यातही अडकली आहे. तिच्या कामापेक्षा ती  तिच्या अफेअर आणि रिलेशनशिपमुळेच जास्त चर्चेत राहिली आहे. साराने 'बिग बॉस 13' मध्ये सहभागी झालेला स्पर्धक पारस छाबरालाही डेट करत होती. आजकाल सारा अंकित गेरासह रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे.  साराने बिग बॉसमध्ये अभिनेता अली मर्चंटशी लग्न केले. पण नंतर दोघांचा घटस्फोट झाला.

सारा मुळात खूप सुंदर दिसते तरीही आणखी सुंदर दिसण्याच्या नादात  लिप सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि या सर्जरीने तिला देव आठवला. होय, ही सर्जरी करून सारा इतकी पस्तावली की, आपण हा खुळेपणा केलाच का? असा प्रश्न तिला सतावत होता. सर्जरीनंतर जवळजवळ वर्षभर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्जरी करण्याचा माझा तो निर्णय मूर्खपणाचा होता, असेही तिने सांगितले होते. लिप सर्जरीनंतर सारा प्रचंड ट्रोल झाली होती.

सुंदर दिसण्याऐवजी माझा सुंदर चेहरा बिघडला. माझे ओठ मलाच आवडले नाहीत. मग ते इतरांना काय आवडणार. या लिप फिलरनंतर वर्षभर मी अनेक अडचणींचा सामना केला. वर्षभर अगदी स्वत:ला आरशात बघण्याची हिंमतही होईना. कसेही करून फिलर कमी व्हावेत, यासाठी वाट पाहण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय राहिला नव्हता. सुदैवाने काळासोबत सगळे काही ठीक झाले आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला.’

टॅग्स :सारा अली खान