Join us

अरुंधती-आशुतोषमध्ये मोठा वाद; रागाच्या भरात अरुंधतीने सोडली कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 19:04 IST

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांच्यात मोठा वाद होतो.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील मैत्री चांगलीच खुलली आहे. त्यामुळे त्यांचं प्रत्येक गाणं, म्युझिक अल्बम लोकप्रिय होत आहे. इतकंच नाही तर आता हे दोघं एकाच कंपनीत पार्टनर म्हणून कामही करत आहेत. मात्र, या दोघांच्या मैत्रीला तडा जाणार आहे. या दोघांमध्ये मोठा वाद होणार असून अरुंधती कंपनी सोडून जाणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आणि आशुतोष यांच्यात मोठा वाद होतो. आणि, रागाच्या भरात अरुंधती कंपनी सोडण्याचा निर्णय घेते. इतकंच नाही तर आशुतोषदेखील तिच्यासोबत काम करायचं नाही असं जाहीर करतो. 

दरम्यान, आशुतोष अविनाशला त्यांच्या कंपनीत काम करायची संधी देतो. त्यावर ते फक्त माझे नातेवाईक आहेत हे पाहून त्यांना काम देणं चुकीचं आहे असं अरुंधती सांगते. सोबतच आशुतोष आणि माझी मैत्री असल्यामुळे त्यांनी मला गाण्याची संधी दिली असंही लोक म्हणतात, असं उदाहरण देत आशुतोषचं हे वागणं न पटल्याचं ती सांगते. परंतु, आशुतोषही त्याचं मत मांडतो.

यामध्ये दोघांमध्येही मोठा शाब्दिक वाद होतो आणि रागामध्ये अरुंधती नोकरी सोडायचा निर्णय घेते. मात्र, काही काळ गेल्यावर या दोघांनाही  त्यांची चूक समजते. परंतु, आता या दोघांपैकी पहिले माफी कोण मागणार? अरुंधती पुन्हा नोकरी करणार का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनमधुराणी प्रभुलकर