Big Boss 11 : बिग बॉसच्या घरात १३ आॅक्टोबरला घडले असे काही !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 9:22 AM
-रेश्मा पाटील१३ आॅक्टोबर रोजी बिग बॉसच्या घरात सरगुन मेहता, ज्या डेलीसोपच्या पॉप्यूलर चेहऱ्यांपैकी एक आहेत आणि मनु पंजाबी ...
-रेश्मा पाटील१३ आॅक्टोबर रोजी बिग बॉसच्या घरात सरगुन मेहता, ज्या डेलीसोपच्या पॉप्यूलर चेहऱ्यांपैकी एक आहेत आणि मनु पंजाबी जे गेल्या वर्षाच्या बिग बॉसचे कंटेस्ट होते. या दोघांचे बिग बॉसच्या बाबतीत विचार इंटरव्यूवच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दरम्यान सरगुन मेहताला जेव्हा विचारण्यात आले की, तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे, तर त्यांनी सपना चौधरीचे नाव सांगितले. कारण एका दोन मिनीटाच्या सीनमध्ये तिच्या हातात लाटणे व कडशी होती आणि ती ज्या प्रकारे अर्शीच्या मागे हात धुवून लागली होती त्यावरून सर्वांना असे वाटत होते की, जणू ते लाटणे अर्शीच्या डोक्यात घालते की काय? या वेळी सपनाने ज्या प्रकारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यामुळेच सपना सरगुनची आवडती कंटेस्टंट आहे. हाच प्रश्न मनू पंजाबीला विचारला असता तेव्हा त्यांनी शिल्पा शिंदेचे नाव सांगितले. कारण ती जेवढी आगाऊ आहे, डोकेफिरू आहे तेवढीच ती शांत राहून स्वत:चा गेम व्यवस्थित खेळू शकते. जेव्हा विकास शिल्पाच्या कपड्यांवर चहा ओततो तेव्हा शिल्पा फक्त बडबड करत आदडआपट न करता स्वत:चे कपडे उचलते आणि प्रेमाने कपड्यांना साबण लावून बेसिनमध्ये धुते आणि म्हणते की, मी या गोष्टींवर विचार करेल. मनू पंजाबी यावरून म्हणतो की, या ठिकाणी जर मी राहिलो असतो तर मला नाही माहित की मी काय केले असते. पण नक्कीच काहीतरी करुन मी बिग बॉसच्या घरामधून बाहेर गेलो असतो. थोडक्यात त्याला असे म्हणायचे होते की, मी विकासला आपटले असते आणि हाऊसमधून हॅपीली बाहेर पडलो असतो. या दोघांच्या इंटरव्यूवमध्ये सपना चौधरीच्या भावाचाही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इंटरव्यूव घेण्यात आला आणि जाणून घेण्यात आले की, सपना कशा स्वभावाची आहे, घरातही ती अशीच वागते का? भावाने सांगितले की, ती अशीच आहे. एकदा जर तिला संताप आला तर ती कडशीही मारु शकते, आणि फक्त तिला रडवू नका. कारण जर ती एकदा रडायला लागली तर ती कुणालाही काहीही करु शकते आणि ती हाऊसमधून बाहेर पडेल. सरगुन आणि मनु पंजाबी यांच्या दोघांच्या चर्चेतून एक गोष्टदेखील माहित झाली की, हिना किती आरडाओरड करते. शिवाय त्याच वेळी ती शांत राहून स्वत:ची स्ट्रॅटजी बनविते, कधी प्रेमाने बोलते म्हणजेच तिला हा गेम खेळायला नक्कीच येतो. त्यानंतर बिग बॉस अनाउन्स करतात की, जेलमध्ये जाण्यासाठी कॅप्टन विकासने एक नाव सुचवावे. जेलमध्ये तो व्यक्ती जातो, जो कॅप्टनने सांगितलेले काम ऐकत नाही, ज्याचे परफॉर्मस वीक आहे. या निकषांवरु न विकास हिनाचे नाव घेतो. कारण हिना विकासला उडावून लावते, त्याने सांगितलेले काम ऐकत नाही, स्वत:च्या मर्जीनुसारच कामे करते. हिना तिचे नाव ऐकून रिअॅक्ट करते की, ‘मला काही हरकत नाही जेल मध्ये जायायला, मात्र मी विकासचे कोणतीच कामे ऐकणार नाही कारण तो स्वत: एक कामचोर आहे. त्यामुळे तो कॅप्टन असायचा अजिबात लायकीचा नाही’. त्यानंतर शिल्पादेखील या चर्चेत सहभाग घेते आणि म्हणते की, ‘विकासला खरेतर अर्शीला जेलमध्ये पाठवायला हवे होते’. पण सर्वजण म्हणतात की, अर्शीने खूप चांगले कामे केली आहेत. स्वत:चे नाव शिल्पाच्या तोंडून ऐकताच ती खूप भडकते आणि शिल्पाला सांगते की, ‘तु पागल आहेस आणि मी तुझ्या तोंडावर थुंके ल’. त्याचबरोबर अर्शीदेखील विकासला सांगते की, ‘तु सपनाला जेलमध्ये पाठवायला पाहिजे होते’. सपनादेखील स्वत:चे नाव अर्शीच्या तोंडून ऐकताच खूप भडकते आणि अर्शीला म्हणते की, ‘मी चप्पल मारुन तुझे तोंड लाल करेल’. मात्र या बोलण्याचा परिणाम अर्शीवर काहीच होत नाही. याउलट ती सपनाच्या समोर नाचून, गाणे म्हणून दाखवते आणि तिला अजून भडकावण्याचा प्रयत्न करते. जिथे सर्वांनीच तलवारी बाहेर काढल्या तिथे शिवाणी दुर्गा का मागे राहतील. कारण त्यादेखील या आठवड्यात नॉमिनेट झाल्या आहेत. ज्यावेळी शिल्पा आणि अर्शीची तु तू मै मै चालू असते, तेव्हा ज्योती म्हणते, ‘अरे आता मजा येईल, कारण दोघेही भांडण करत आहेत.’ हे ऐकून शिवाणी दुर्गा तिच्या डोळ्यावर वटारतात आणि तिला ऐकवतात की, भांडणे झाले की लोकांना मजा का येते. त्यानंतर बिग बॉस अजून एक अनाउन्स करतात की, चार शेजाऱ्यांनीदेखील अजून एक नाव द्यावे की, ज्याला आपणास जेलमध्ये पाठविता येईल. तेव्हा शेजारी वेगळे जाऊन चर्चा करतात आणि सपनाचे नाव सुचवितात. सपनादेखील स्वत:ला व्हॉल्यूंटिअर करुन घेते आणि नंतर घरचे लोकदेखील सांगतात की, टास्कच्या वेळी सपना झोपते. म्हणून सपनादेखील आनंदाने जेलमध्ये जायायला तयार होते. बिग बॉस पुन्हा विकासला अजून एक नाव द्यायला सांगतात आणि अर्शीचे नाव सांगितले जाते. त्यानंतर हिना खान, अर्शी खान आणि सपना चौधरी हे तीन लोक जेलमध्ये डांबले जातात. जेलमध्ये जेवताना अर्शी थोडे नाटके करायला लागते. सपनाला चिडविण्यासाठी बोलते की, जेलमध्ये किती किडे आहेत. सपनाला फक्त चिडण्याची संधीच हवी असते. सपनाला चिडायला अजिबात वेळ लागत नाही. हिना सपनाला समजावयचा प्रयत्न करते की, ती तुला चिडवायचा प्रयत्न करत आहे. मात्र जेवल्यानंतर सपना अशी भडकते आणि कोपऱ्यात पडलेली मॉर्टिनची बॉटल उचलते आणि अर्शीच्या तोंडावर स्प्रे करते आणि बोलते की, ‘खूप किडे आहेत ना, हे घे मी किडे मारते’. अन् तिच्या तोंडावर मॉर्टिनची बॉटल स्प्रे करतच राहते त्यानंतर पूर्ण रुममध्येही स्प्रे मारते. ती एवढाही विचार करत नाही की, अर्शीला अस्थमाचा त्रास आहे, ती पंपचा वापर करते. अर्शी खान थोडा वेळ टॉयलेटमध्ये जाते आणि परत आल्यावर कोपऱ्यात पडलेली खुर्ची उचलते आणि सारखी आदडआपट करते. अशी एवढ्यावरच थांबत नाही तर सपना घरात झाडू मारतानाही ती थुंकते. दिवसाच्या शेवटी हितेन आणि विकास जेलच्या बाहेर ह्या तिघांसोबत गप्पा मारताना दिसतात. त्यात हितेन अर्शीला सांगतो की, ‘आज बिग बॉस हाऊसमध्ये सन्नाटा आहे. काही कॉरिओग्राफी चाललेली नाही, कोणी गात नाही, कोणी नाचत नाहीत’. शिवाय गप्पागोष्टीतून थट्टा मस्करीही सुरु होते, त्यात हितेन म्हणतो की, ‘नागिन म्हणजे अर्शी जेलमध्ये (आत) आहे आणि आम्ही बाहेर आहोत आणि मी आज शांतपणे हिनाच्या बेडवर झोपणार आहे. यावरुन अर्शी म्हणते की, हिनाच्या बेडवर कशाला, माझ्या बेडवर झोप आणि अशी गंमत करता-करता ते हसताना दिसतात. (रेश्मा पाटीलने बिग बॉसच्या घरातील या घडामोडी टिपल्या असून ती बिग बॉसची मोठी फॅन आहे. तिने आजवर कधीच कोणत्याच सिझनचा कोणताच भाग मिस केलेला नाही.)