बिग बॉस : गौरव-बानीची रोमॅण्टिक डेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 5:31 PM
टास्कवरून घरात घमासान सुरू असतानाच गौरव चोपडा आणि बानी जे या जोडप्याची रोमॅण्टिक डेट घरातील वातावरण प्रफुल्लित करण्यात काहीशी ...
टास्कवरून घरात घमासान सुरू असतानाच गौरव चोपडा आणि बानी जे या जोडप्याची रोमॅण्टिक डेट घरातील वातावरण प्रफुल्लित करण्यात काहीशी कारणीभूत ठरली. गेल्या आठवड्यात कॅप्टन लोपामुद्रा राऊत हिच्या दंडाला पात्र ठरलेल्या गौरव चोपडा याने बिग बॉसने दिलेल्या एका टास्कमध्ये बाजी मारत रोमॅण्टिक डिनर डेटसाठी पात्रता मिळविली होती. यावेळी त्याने बानीबरोबर डिनर डेटला जायला आवडेल असे बिग बॉसला सांगितले होते. त्यानुसार बिग बॉसने या जोडप्यासाठी घरातीलच लिव्हिंग एरियामध्ये डिनर डेटची व्यवस्था केली होती. }}}} दरवर्षी बिग बॉसच्या घरात जुळलेल्या जोडप्यांसाठी डिनर डेटची व्यवस्था केली जाते. यावेळेस गौरव चोपडा आणि बानी जे यांना ही संधी मिळाली. मिणमिणत्या प्रकाशात एका आलिशान टेबलावर ठेवलेले पंचपक्वान्न आणि सोबत वाइन असाच काहीसा मेनू असलेल्या या डिनर डेटचा दोघांनी चांगलाच आनंद लुटला. एकमेकांचे कौतुक करताना, दोघांनीही जेवणाचा भरपूर आनंद लुटला. यामुळे दोघांमधील संबंध पूर्वीच्या तुलनेत अधिक घट्ट झाल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. या डिनर डेटमुळे घरातील वातावरणावर मात्र काहीसा परिणाम झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. घरातील अन्य सदस्यांनी दोघांच्या डेटला शुभेच्छा देत त्यांचे अनुभव विचारण्याची संधी दवडली नाही. त्यामुळे घरात काही काळ प्रेमाचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले होते. या शोच्या पहिल्या दिवसापासून बानी गौरवप्रती आकर्षित होती. परंतु गौरवने स्वत:ची इमेज जपण्याच्या नादात बानीला वेळोवेळी नाकारले. तसेच घरात माझ्या चहुबाजूने कॅमेरे असल्याने मी या गोष्टीला महत्त्व देऊ शकत नाही, असेही तो वेळोवेळी सांगत आला आहे; मात्र वाइल्ड कार्ड एंट्रीने घरात आलेल्या जेसनकडे बानीची वाढती जवळीकता गौरवला खटकू लागल्याने तो बानीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु मध्येच एका टास्कमध्ये नेहमीप्रमाणेच गौरवने बानीला बळी ठरविल्याने ती तिच्यावर आणखी भनकली. बिग बॉसने दिलेल्या ‘प्यार का तोहफा’ या टास्कमध्ये मात्र त्यांच्यातील हा दुरावा काहीसा दूर झाला. त्यामुळे त्यांची ही रोमॅण्टिक डिनर डेट सुखद ठरली. दरम्यान, या आठवड्यासाठी दोघेही नॉमिनेट असल्याने यांच्यातील हा प्यार का सिलसिला कुठपर्यंत जातो हे लवकरच समजणार आहे. प्रेक्षकांनी या दोघांना सेफ ठरविल्यास या लव्ह बर्ड्सच्या काही लीला प्रेक्षकांना बघावयास मिळतील यात शंका नाही.