Join us

Big Boss Marathi 2: एक फोन केला तर 2 कोटी येतील; अभिजीत बिचुकले 'ती'ला २५ लाख द्यायला तयार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 1:29 PM

बिग बॉस मराठीचं दुसऱ्या सीझनमधील अभिजीत बिचुकले यांचीच चर्चा सध्या रंगलेली आहे. आपल्या संभाषणाने आणि हटके स्टाईलने बिचुकले सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत.

ठळक मुद्देआपल्या संभाषणाने आणि हटके स्टाईलने बिचुकले सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. मी जर जिंकलो तर मिळालेले 25 लाख रुपाली भोसलेला देऊन टाकेन' असं त्यांनी जाहीर केले आहे. बिचुकले यांनी 'माझ्याकडे पैसे आहेत. मी एक फोन केला तर 2 कोटी सहज उभे करू शकतो. तुम्ही कोणासोबत खेळ खेळता हे अजून तुम्हाला माहिती नाही' असंही म्हटलं आहे. 

मुंबई -  बिग बॉस मराठीचं दुसऱ्या सीझनमधील अभिजीत बिचुकले यांचीच चर्चा सध्या रंगलेली आहे. वाद–विवाद, भांडण, नॉमिनेशन टास्क, मैत्री, प्रेम अशा सर्वच गोष्टी घरात पाहायला मिळत आहेत. आपल्या संभाषणाने आणि हटके स्टाईलने बिचुकले सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. बुधवारी (5 जून) अभिजीत यांनी बिग बॉसच्या घरात एक घोषणा केली. 'मी जर जिंकलो तर मिळालेले 25 लाख रुपाली भोसलेला देऊन टाकेन' असं त्यांनी जाहीर केले आहे. 

बिग बॉसच्या बुधवारच्या एपिसोडमध्ये चोरबाजार हा एक टास्क घेण्यात आला होता. त्यावेळी अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले हे टास्कबद्दल बोलत होते. आर्थिक गोष्टींचा विषय निघाला त्यावेळी  'मी जर बिग बॉस हा शो जिंकलो तर मला मिळालेले 25 लाख रुपये घेऊन जाणार नाही तर ते तुला देऊन टाकेन, मी येथे पैसे कमवायला आलेलो नाही तर खेळ खेळायला आलो आहे' असं म्हटलं आहे. तसेच बिचुकले यांनी 'माझ्याकडे पैसे आहेत. मी एक फोन केला तर 2 कोटी सहज उभे करू शकतो. तुम्ही कोणासोबत खेळ खेळता हे अजून तुम्हाला माहिती नाही' असंही म्हटलं आहे. 

अभिजित बिचुकले यांनी 25 लाख रुपये देऊन टाकेन असं म्हणताच रुपाली रडू लागली. मात्र तिने त्याआधी बिचुकले यांच्यासमोर हे टास्कसाठी नाटक करत असल्याचं कॅमेऱ्यामध्ये सांगितलं. तसेच 'तुमच्यात माणुसकी आहे. त्याशिवाय कोणी इतक्या सहज मदत करायला तयार होत नाही. तुम्ही तर मला तुमचे 25 लाख द्यायला तयार झालात' असं रुपालीने म्हटलं आहे. सध्या बिग बॉसच्या घरात चोरबाजार टास्क सुरू आहे. या टास्क दरम्यान चोरीला गेलेल्या सामानावरून अनेक स्पर्धकांमध्ये वाद सुरू आहेत. 

बिग बॉस मराठी २ च्या घरात या कारणामुळे किशोरी शहाणे यांना रडू कोसळलेबिग बॉसचं घर सदस्यांच्या प्रत्येक भावभावनांचा साक्षी असते... राग, प्रेम, तिरस्कार, हसणं आणि रडणं या सगळ्या गोष्टी आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतात. बिग बॉस मराठीच्या घरात किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून राहात आहेत... त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना वाटतो आहे... पण बिग बॉस यांनी दिलेल्या चोरबाजार या टास्क दरम्यान शिवानी आणि किशोरी मध्ये वाद झाला. या टास्क दरम्यान त्यांचं सामान खराब केलं, त्यांना टार्गेट करण्यात आले या गोष्टीचे किशोरी शहाणे यांना खूप वाईट वाटलं. आपल्या मनात काय आहे हे त्यांनी बिचुकलेंना सांगितले... अभिजित बिचुकलेनी किशोरी शहाणे यांनी धीर द्यायचा प्रयत्न केला... अभिजीत बिचुकले यावर असे देखील म्हणाले, आताच्या आता 14 सदस्यांना तुमचं काय दु:ख आहे ते सांगू आणि तुमचे सामान काही असेल तर त्यांना ते तुम्हाला परत करायला सांगू... अभिजीत प्रमाणेच मैथिलीने देखील किशोरी शहाणे यांना खूपच समजवण्याचा प्रयत्न केला.

Big Boss Marathi 2 : बिग बॉस मराठीच्या घरात या स्पर्धकांमध्ये फुलतेय प्रेमकथा?बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाल्यापासूनच आताच्या सिझनमध्ये कोणत्या स्पर्धकांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार अशी चर्चा रंगली होती. आता नुकत्याच झालेल्या प्रसारित झालेल्या भागांमध्ये प्रेक्षकांना एक प्रेमकथा फुलताना दिसत आहे. या कार्यक्रमात पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले यांच्यातील संवाद पाहाता डाल में कुछ काला है असे आता लोकांना वाटायला लागले आहे. पराग हा प्रसिद्ध शेफ असून रुपाली ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. बडी दूर से आएं है ही तिची सुमीत राघवनसोबतची मालिका प्रचंड गाजली होती. पराग आणि रूपाली यांच्यात बिग बॉसच्या घरात खूपच चांगली मैत्री झाली आहे. 

 

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत बिचुकलेरुपाली भोसलेकलर्स मराठी