Join us

बिग बॉस मराठी 2: कसा आहे घरातील आतील नजारा, फोटो पाहून घरात जाण्यासाठी व्हाल आतुर

By गीतांजली | Published: May 28, 2019 12:28 PM

वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय ठरलेल्या शो म्हणजे बिग बॉस. 'बिग बॉस मराठी २'ची  घोषणा झाल्यापासून घरात कोण-कोण जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.

गीतांजली आंब्रे

वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय ठरलेल्या शो म्हणजे बिग बॉस. 'बिग बॉस मराठी २'ची  घोषणा झाल्यापासून घरात कोण-कोण जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. बिग बॉसचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो. या साऱ्यांची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. बिग बॉसच्या घरात यावेळीची थीम काय असणार, घरात काय वेगळं पाहायला मिळणार असे अनेक प्रश्न मनात होते. यातील काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बिग बॉसच्या ग्रँड प्रिमिअरनंतर मिळालीच असतील. आम्ही तुम्हाला या वेळेचं बिग बॉसचं घर कसं वेगळं आहे ते फोटोंच्या माध्यमातून सांगणार आहोत. 

बिग बॉस मराठीचे घर ओमंग कुमार यांनी डिझाईन केलं आहे. हे घर तब्बल 14000 स्केवअर फुटांवर केले आहे. हे घर पाहुन त्यातील केवळ सदस्यच नाही तर प्रेक्षक ही त्याच्या प्रेमात पडतील. यावेळी बिग बॉसच्या घराला वाड्याची  थीम देण्यात आली आहे.

गार्डन एरियामध्ये तुळशी वृंदावन, स्वीमिंग पूल, जीम आणि झोपाळा या साऱ्याच गोष्टी आहेत मात्र तुमचं लक्ष वधून घेईल ते घराच्या बाहेर लावलेली लिंबू मिर्ची. याच गार्डन एरियामध्ये बरेचसे टास्क सदस्य आपल्याला पुढच्या 90 दिवसांमध्ये खेळताना दिसणार आहेत.  

 

घरात प्रवेश केल्यानंतर लागते ती प्रशस्त लिव्हिंग रुम. लिव्हिंग रुममध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर काम केले आहे. घरातील सदस्यांनी पॉझिटीव एनर्जी देण्यासाठी गडद रंगाचा पुरेपुर वापर लिव्हिंग एरियामध्ये करण्यात आला आहे. लिव्हिंग रुममधल्या सोफ्यावर स्पर्धक दर आठवड्याला बसून महेश मांजरेकर यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसणार आहेत.   

लिव्हिंग एरियाच्या बाजूलाच ओपन किचन आहे. हे किचन अतिशय प्रशस्त आहे. किचनमध्ये चिनी मातीच्या भांड्याचा वापर करण्यात आले आहे.

तसेच मुंबईचा डबेवाला आणि चहावाल्यांची दखलसुद्धा घेण्यात आल्याचे दिसते.  चाहवाल्यांची किटली आणि डब्ब्यांचा वापर करुन किचनची सजावट करण्यात आली आहे. 

इतर रुमप्रमाणे बिग बॉसच्या घरातील वॉशरुम ही तितकिच लॅव्हिश आहे. वॉशरुममधली एक भिंत तुमचं लक्ष वेधून घेईल या संपूर्ण भिंतीवर बांगड्या लावून सजवण्यात आली आहे. 

 

मुलींच्या बेडरुममध्ये घुंगरू आणि नथ लावून सौंदर्याला चार चांद लावण्यात आले आहे. मुलींच्या आणि मुलांच्या बेडरुममध्ये सुंदर रंगसंगीतांचा वापर करुन ती डेकोरेट करण्यात आली आहे.

दिवसभराचे टास्क खेळून तुम्हाला याठिकाणी आल्यावर निवांत झोप लागेल याची काळजी नक्कीच बिग बॉसकडून घेण्यात आली आहे. 

कन्फेशन रुम ही बॉग बॉसच्या घरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कन्फेशन रूममध्ये येऊन सदस्य थेट बिग बॉस यांच्याशी संवाद साधतात, त्यांचं मन मोकळं करतात, त्यांच्या मनातील गोष्टी बिग बॉसकडे मांडतात.  

टॅग्स :बिग बॉस मराठी