Join us

Big Boss Marathi : 2 मध्ये महेश मांजरेकर दिसणार कीर्तनकारच्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 20:30 IST

'बिग बॉस 2' च्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना यंदा बिग बॉसच्या घरात कोणाकोणाचा समावेश असणार याची उत्सुकता लागली होती.

ठळक मुद्देलावणीतील दिग्गज दुसरी कोणी नसून लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर असल्याचे म्हटले जात आहे

'बिग बॉस 2' च्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना यंदा बिग बॉसच्या घरात कोणाकोणाचा समावेश असणार याची उत्सुकता लागली होती. बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्या प्रोमोनुसार यंदा घरात राजकारणातील एखादी व्यक्ती दिसणार अशी शक्यता वर्तवली जात होती. आता ही व्यक्ती कोण असेल? याचा अंदाज रसिक लावतीलच पण लवकरच हे नाव कोण असेल याचा उलगडा होणार आहे.  

पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली असे आपल्या सगळ्यांचे आवडते महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सीझन 2 चे सूत्रसंचालन करणार आहेत. जनजागृती, लोकशिक्षण, पुराण कथेतून संस्कृती दर्शन आणि थोर परंपरेची जाणीव करून देणारा अतिशय सशक्त लोककलेचा प्रकार म्हणजे कीर्तन. आणि कीर्तनकार हा मुळातच पुराण इतिहासातील आदर्श दाखले देऊन आजच्या समाजाला कस वागावं, कस जगावं, हे कानपिचक्या देऊन शिकवतो. हे सांगण्याचा उद्देश असा कि, बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये महेश मांजरेकर कीर्तनकाराच्या रुपात दिसणार आहेत... बिग बॉस मराठीच्या प्रोमोजमधून महेश मांजरेकर वेगवेगळ्या अंदाजमध्ये प्रेक्षकांसमोर आले. आता जर असे विविध क्षेत्रातील कलाकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य म्हणून आले तर काय होईल हे बघणे रंजक असणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या कार्यक्रमाच्या नव्या सीझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. लावणीतील दिग्गज दुसरी कोणी नसून लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर