Join us

बिग बॉस मराठी २ - स्पर्धक विद्याधर जोशी बाहेर, तर या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 9:48 AM

बिग बॉस मराठीच्या घरामधून विद्याधर जोशी घराबाहेर पडले याचे सगळ्याच सदस्यांना खूप भावूक झाले होते.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या. मग घरामध्ये पार पडलेले 'एक डाव धोबीपछाड' हा टास्क असो किंवा 'शेरास सव्वा शेर' हा नॉमिनेशन टास्क असो. यावर सगळ्याच सदस्यांची कानउघडणी केली. बिग बॉस मराठीच्या घरामधून मागील आठवड्यामध्ये दिगंबर नाईक घराबाहेर पडले. आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये विणा जगताप, सुरेखा पुणेकर, विद्याधर जोशी, पराग कान्हेरे, शिव ठाकरे हे नॉमिनेशनमध्ये होते ज्यामध्ये पराग कान्हेरे आणि विद्याधर जोशी डेंजर झोनमध्ये गेले. महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये विद्याधर जोशी यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामधून विद्याधर जोशी घराबाहेर पडले याचे सगळ्याच सदस्यांना खूप भावूक झाले होते. विद्याधर जोशींना त्यांच्या आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली. महेश मांजरेकर यांनी विद्याधर यांना एक विशेष अधिकार दिला ज्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला सेफ आणि अनसेफ करायचे होते. त्यांनी नेहा शितोळेला सेफ केले आणि कोणालाही अनसेफ करण्यास नकार दिला.

 

'एक डाव धोबीपछाड' या टास्कमध्ये वैशाली संपूर्ण टास्क टीम B च्याच बाजूने खेळली असे म्हणणे पडले. तर विणा, किशोरी आणि रुपाली यांचा KVR ग्रुप पहिल्या आठवड्यापासून घरामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे. विकेंडचा डावमध्ये म्हणी विषयी एक खेळ खेळण्यात आला, ज्यामध्ये सदस्यांना विचारण्यात आलेली म्हण कोणत्या सदस्याला लागू पडते हे ओळखायचे होते. ''काना मागून आली आणि तिखट झाली'' हि म्हण हीनाला योग्य आहे असे रुपालीचे म्हणणे पडले. ''वासरात लंगडी गाय शहाणी'' ही म्हण वैशालीला तर ''बडी बडी बाते वडापाव खाते'' ही म्हण परागला योग्य आहे असे सर्वच सदस्य म्हणाले, ''उथळ पाण्याला खळखळाट फार'' ही म्हण माधवला योग्य आहे असे सदस्यांनी सांगितले.

तर वूट आरोपी कोण ? यावर पराग आरोपी आहे असे सांगितले तर परागला शिक्षा दिली कि त्याने विणा, रुपाली आणि किशोरीची माफी मागावी जी शिक्षा त्याने पूर्ण केली. तर यानंतर पराग आणि रुपाली तर शिव आणि विणाने डान्स सादर केला. यानंतर अजून एक गंमतीदार खेळ रंगला ज्यामध्ये सदस्यांना ऐकवण्यात आलेली गाणी कोणासाठी आहे हे ओळखायचे होते. ज्यामध्ये सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली.

 

 

टॅग्स :विद्याधर जोशीबिग बॉस मराठी