Join us

Bigg Boss marathi 3: 'हिला अक्कलच नाहीय',एका शब्दामुळे स्नेहा वाघवर भडकले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 12:11 PM

Sneha Wagh चा सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओच यासाठी कारणीभूत ठरला आहे. व्हिडीओवर रसिकांच्या संतप्त प्रतिक्रीया उमटल्याचे पाहायला मिळतंय.

स्नेहा वाघ ही स्पर्धक सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी झाल्यानंतर ती तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली होती. त्यात तिचा पूर्वाश्रमीचा पती अविष्कार दारव्हेकरही सहभागी झाला होता. त्यामुळे दोघांच्या नात्यावरही प्रचंड चर्चा झाली. स्नेहा वाघचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अविष्कारने तिचा छळ केल्याचे तिने म्हटले होते. नऊ वर्ष दोघांचा संसार टिकला. शेवटी दोघेही घटस्फोट घेत वेगळे झाले. अविष्कार आता शोचा भाग नाही. घरात त्याची कामिगीरी काही खास नव्हती. नुकताच तो घरा बाहेर पडला आहे. आता पुन्हा एकदा स्नेहा वाघवर चाहते संताप व्यक्त करताना दिसत आहे.

 सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओच यासाठी कारणीभूत ठरला आहे. व्हिडीओवर रसिकांच्या संतप्त प्रतिक्रीया उमटल्याचे पाहायला मिळतंय. रोज सकाळी स्नेहा झोपेतून उठल्यावर बिग बॉसच्या घरात लावलेल्या कॅमेरा समोर येते. 'सारंगी बिग बॉस', गुड मॉर्निंग असे बोलताना दिसते. 'सारंगी' म्हणजे काय ? असाही अनेकांना प्रश्न पडतो. हा एक कोरियन शब्द आहे. सारंगी याचा अर्थ “आय लव यू” असा होतो. सारंगी बिग बॉस म्हणजेच बिग बॉस आय लव यु.  

 

 

हे ऐकूनच स्नेहा वाघच्या अशआ वागण्यावर काही चाहत्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. असे वागणे काही नेटीझन्सना चांगलेच खटकले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जरी स्नेहा वाघला जास्त पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत असले तरी दुसरीकडे तिला प्रचंड ट्रोलही केले जात आहे. 

स्नेहा वाघ प्रत्यक्ष आयुष्यातही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे.मध्यंतरी तिच्या रिलेशनशिपच्याही चर्चा रंगल्या होत्या.11 वर्षांनी लहान असलेल्या फैझल खानसोबत तिचे अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांचे सतत एकत्र फोटो पाहायला मिळायचे. होणाऱ्य  चर्चांमुळे स्नेहा वाघने स्पष्टीकरण देत या सगळ्या अफवा असल्याचे तिने म्हटले होते.स्नेहा वाघने मालिका विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीच नाही तर हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.  

टॅग्स :स्रेहा वाघबिग बॉस मराठी