'बिग बॉस मराठी 3'च्या घरात कधी मित्र बनतील तर कधी एकमेकांचे शत्रु हे काहीच सांगता येत नाही. टास्कनुसार घरात नाती बदलताना दिसतात. त्यात घरात आडते स्पर्धक नावडते स्पर्धक असे गटही तयार झाले आहेत. त्यामुळे कधी कोणत्या स्पर्धकाला कोण खटकेल हे सांगता येणंच कठीण.
'बिग बॉस मराठी 3'च्या घरामध्ये सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे कॅप्टन्सीची उमेदवारी कोणाला द्यायची. दोन्ही टीममधील प्रत्येक सदस्य एकाच प्रयत्नात आहे की कशी ती उमेदवारी मिळवता येईल. बर्याच डील, बरीच भांडण, मारामारी, वादावादी देखील सुरू आहे. आज उत्कर्ष, मीरा, जय तसेच विशाल आणि जय यांचे भन्नाट प्लॅनिंग बघायला मिळणार आहे.जय चे म्हणणे आहे, विशालला उगाच दिलंस स्नेहाला दिलं पाहिजे होतं.
मीराचं म्हणणं आहे, गुगली टाकली त्यांनी. जय म्हणाला, महत्वाचं काय आहे माहिती आहे का? विशाल तरी ऐकेल विकास नाही ऐकणार. उत्कर्षचं यावर म्हणणं पडलं ते म्हणतील एकच उमेदवार.दुसरीकडे, जय आणि विशाल यांची चर्चा सुरू आहे. ज्यात हे दोघे एकमेकांना डील देत आहेत. विशाल जयला म्हणाला, मी तुझ्यावेळी नाही हलणार आहे.
जय म्हणाला, मलासुध्दा तेच आहे, मी आता तेच सांगितलं. आपण एकमेकांसोबत इतकी डील करू शकतो ना. जय यावर म्हणाला, तो येणार मला माहिती आहे. तो म्हणणार मी नाही बनलो तर,तो उलटा फुटेल मग.मला तू असलास तर चालेल काही प्रॉब्लेम नाही, मी कालसुध्दा सोनालीला बोललो. आम्ही विशाल किंवा स्नेहामध्ये एकाला देऊ पण मग नंतर तो अडवाअडवी करेल.भरवसा नाही त्याचा. विशाल त्यावर म्हणाला, “त्याचं आणि माझं पण बिनसलं आहे”.