Bigg Boss OTT : करण जोहरवर भडकली सोफिया हयात; म्हणाली, तो सलमानपेक्षाही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:19 AM2021-08-27T11:19:31+5:302021-08-27T11:22:54+5:30

Bigg Boss OTT : करण जोहर ‘बिग  बॉस ओटीटी’ हा शो कसा होस्ट करतो, हे पाहण्याची उत्सुकता नाही म्हटलं तरी सर्वांनाच होती. पण ...

Big Boss OTT sofia Hayat Bashes Karan Johar Calls Him Worse Than Salman Says Promoting Violence And Nepotism | Bigg Boss OTT : करण जोहरवर भडकली सोफिया हयात; म्हणाली, तो सलमानपेक्षाही...!

Bigg Boss OTT : करण जोहरवर भडकली सोफिया हयात; म्हणाली, तो सलमानपेक्षाही...!

googlenewsNext
ठळक मुद्देयाच सोफिया हयातने काही दिवसांपूर्वी करणच्या होस्टिंगचे कौतुक केले होते. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तिने करणचे कौतुक करताना सलमानवर निशाणा साधला होता.

करण जोहर ( Karan Johar) ‘बिग  बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT ) हा शो कसा होस्ट करतो, हे पाहण्याची उत्सुकता नाही म्हटलं तरी सर्वांनाच होती. बिग बॉस सारख्या शोचे होस्टिंग करायला मिळतेय म्हणून करण जाम खूश्श होता. पण त्याचे होस्टिंग प्रेक्षकांना फार आवडल्याचे वाटत नाही. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया तरी हेच सांगणाºया आहेत. आता काय तर नेटक-यांसोबतच सेलिब्रिटीही करण जोहरच्या होस्टिंगवर नाराज असल्याचे दिसतेय. बिग बॉसच्या सातव्या सीझनची स्पर्धक सोफिया हयात (Sofia Hayat ) हिने करणच्या होस्टिंगवर टीका केली आहे. (Sofia Hayat Bashes Karan Johar Calls Him Worse Than Salman)
सलमान खानसोबत तुलना करत सोफियाने करणवर निशाणा साधला आहे. करण जोहर हा सलमानपेक्षाही वाईट आहे, असे तिने म्हटलेय.

8 ऑगस्टला ‘बिग बॉस ओटीटी’ सुरू झाले आणि आत्तापर्यंत करणने दोन ‘संडे का वॉर’ एपिसोड होस्ट केलेत. या दोन्ही एपिसोडमध्ये करण अधिकाधिक शमिता शेट्टीला सपोर्ट करताना आणि अन्य स्पर्धकांची शाळा घेताना दिसला. यामुळे सोफिया हयात संतापली आहे.
 ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सोपिया हयातने करणवर नेपोटिजमला चालना देत असल्याचा आरोप केला. ‘करण सलमान खानपेक्षाही वाईट होस्ट आहे. बिग बॉसच्या घरात तो हिंसा आणि नेपोटिजमला प्रोत्साहन देतोय. हा शो युकेमध्ये सुरू असता तर कदाचित लगेच बंद झाला असता. कारण करण हिंसेचे समर्थन करतोय. टीआरपी मिळवण्याच्या नादात करण लोकांचा अपमान करतोय. कदाचित हा  बिग बॉसचा जुना फॉर्म्युला आहे,’ असे सोफिया म्हणाली. 

‘भारत हा एक धार्मिक देश आहे. येथे लोकांच्या धार्मिक भावनांना प्रचंड महत्त्व आहे आणि करण व बिग बॉस याच धर्माविरूद्ध वागत आहेत. लोकांचा अपमान करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे, घराणेशाहीला समर्थन देणे हा सगळा याचाच प्रकार आहे. हा एक निगेटीव्ह शो आहे. अशा शोमध्ये मी पुन्हा कधीच जाणार नाही,’ असेही सोफिया म्हणाली.
याच सोफिया हयातने काही दिवसांपूर्वी करणच्या होस्टिंगचे कौतुक केले होते. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तिने करणचे कौतुक करताना सलमानवर निशाणा साधला होता. करणला बिग बॉस होस्ट करताना पाहून आनंद वाटला. सलमानचा दरारा आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. आता त्यानं निवृत्ती घ्यायला हवी. अनेकदा तो केवळ ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो. याऊलट करण रिअल वाटतो. करणच्या तुलनेत तो चांगली होस्टिंग करतो, असे सोफिया म्हणाली होती.

Web Title: Big Boss OTT sofia Hayat Bashes Karan Johar Calls Him Worse Than Salman Says Promoting Violence And Nepotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.