बिग बॉसच्या एका सीझनचा विजेता आज चालवतो ढाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 6:17 AM
छोट्या पडद्यावरील रियालिटी शोमध्ये झळकण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कारण या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर स्पर्धकांना नवनवीन संधी तर उपलब्ध होतातच ...
छोट्या पडद्यावरील रियालिटी शोमध्ये झळकण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कारण या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर स्पर्धकांना नवनवीन संधी तर उपलब्ध होतातच शिवाय ग्लॅमर, पैसा आणि लोकप्रियताही मिळते. मात्र याच रियालिटी शोचे विजेतेपद मिळवणारे स्पर्धक तर रातोरात स्टार बनतात. पैसा, प्रसिद्धीसह रसिकांचे प्रेम आणि नवी ओळख विजेत्यांना मिळते. यासोबतच या विजेत्यांसाठी बॉलीवुडचे दरवाजेही आपोआप खुले होतात. रुपेरी पडद्यावर सिनेमात काम करण्याच्या अनेक संधी रियालिटी शोच्या विजेत्याला मिळतात. मात्र बिग बॉसच्या दुस-या सीझनचा विजेता असलेल्या आशुतोष कौशिकबाबत वेगळंच घडत आहे. केवळ बिग बॉसच नाही तर रोडिज या रियालिटी शोचे जेतेपदही त्याने पटकावले आहे. आशुतोष हा मूळचा उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा आहे. रोडिज या रियालिटी शोमध्ये तो सहभागी झाला आणि त्याचे विजेतेपद त्याने पटकावले. त्यामुळेच त्याला बिग बॉसच्या दुस-या पर्वात संधी लाभली.शांत आणि संयमी स्वभावामुळे त्याने बिग बॉसचे विजेतेपदही पटकावलं. यानंतर आशुतोषचे नशीबच पालटलं. पैसा,प्रसिद्धी,लोकप्रियता आणि बॉलीवुडच्या सिनेमात काम करण्याची संधी त्याला मिळाल्या.मात्र असं असतानाही त्याला ढाब्यावर काम करण्याची वेळ आली आहे.सहारनपूरमध्ये आशुतोषचे कुटुंबीय ढाबा चालवतात. तो कोणत्याही रियालिटी शोचा विजेता होण्याआधीपासून त्यांचा हा ढाबा आहे. आशुतोष मुंबईत असताना त्याचा भाऊ हा ढाबा चालवत असे.मात्र आता आशुतोषही हा ढाबा चालवतो आहे. सिनेमात फारसं यश मिळालं नसल्याने कुटुंबाच्या व्यवसायात त्याने लक्ष घातल्याचे बोललं जाते. बिग बॉस आणि रोडिज या शोचा विजेता असणा-या आशुतोषने साहब,बिवी और गँगस्टर-२, जिला गाझियाबाद, शॉर्टकट रोमियो या सिनेमात काम केलं. मात्र सिनेमात त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. मध्यंतरी तो दारुच्या आहारी गेला होता.मद्यधुंद अवस्थेत अंडरवेअरवर फिरताना पोलिसांनी त्याला अटकही केली होती.त्यामुळे करियरमध्ये अपयश आलं असल्यानेच आशुतोष बहुदा आपला ढाबा चालवण्याच्या व्यवसायात लक्ष घालत असावा. AlSo Read:‘बिग बॉस’मध्ये आवामची मने जिंकणारी अर्शी खान ‘बिग ब्रदर’मध्येही दाखविणार जलवा!