Join us

बिग बॉस : कॅप्टनसीवरून घरात आले वादळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 3:39 PM

बिग बॉसचे गेल्या दोन आठवड्यातील एपिसोड बघितल्यास असे वाटत होते की, घरातील सदस्यांमध्ये किरकोळ मतभेद सोडल्यास सगळं काही आलबेल ...

बिग बॉसचे गेल्या दोन आठवड्यातील एपिसोड बघितल्यास असे वाटत होते की, घरातील सदस्यांमध्ये किरकोळ मतभेद सोडल्यास सगळं काही आलबेल सुरू आहे; मात्र कॅप्टनसीसाठी देण्यात आलेल्या टास्कवरून पुन्हा एकदा घरात जबरदस्त वादळ आले असून, सदस्यांमध्ये पहिल्यासारखेच घमासान सुरू झाले आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटी विरुद्ध इंडियावाले हा वाद अजूनही घरात कायम असल्याचेही अधोरेखित झाले आहे.घरात दिवसाची सुरुवात सलमान आणि माधुरी यांच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाच्या ‘ये मौसम का जादू है मितवा’ या गाण्याने झाली. त्यामुळे आज काहीतरी वेगळा टास्क दिला जाईल याची चुणूक घरातील सदस्यांना लागली होती. त्यानुसार बिग बॉसने कॅप्टनसी आणि लक्झरी बजेटसाठी घरातील सदस्यांना ‘काश्मीरमधील वादळ’ हा टास्क दिला. यासाठी घरातील गार्डन एरियाला कश्मिरी लूक देण्यात आला. त्यात एक झोपडी (इग्लू) बनविण्यात आली, ज्यास घरवाल्यांनी मिळून डेकोरेट केले होते. टास्कनुसार घरात अचानक बर्फाचे वादळ येत असते, वादळ येताच संगळ्यांना इग्लूमध्ये जायचे असते. जो सदस्य सर्वात शेवटी इग्लूमध्ये जाणार तो सदस्य कॅप्टनसीच्या रेसमधून बाहेर पडणार होता. त्यामुळे या टास्कमध्ये घमासान बघावयास मिळेल हे निश्चित होते. त्यातच स्वामी ओम यांनी सुरुवातीलाच टास्क जिंकण्यासाठी मी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो असे जाहीर आव्हान दिल्याने टास्कमध्ये पहिल्यासारखीच हमरीतुमरी बघावयास मिळाली. टास्कच्या सुरुवातीलाच मोनालीसा बाहेर पडल्याने मनू आणि मनवीरमध्ये अस्वस्था निर्माण झाली होती. त्यातच स्वामी ओम इग्लूच्या समोरच स्टूल ठेवून बसल्याने इतर घरवाल्यांसाठी इग्लूचे दरवाजे त्यांनी एकप्रकारे बंद केले होते. स्वामी ओमला विरोध करण्यासाठी गौरव चोपडा याने तर थेट इग्लूच्या वरच्या भागावर बैठक मारली. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. वाद वाढणार तेवढ्यातच बिग बॉसने लोपाला इग्लूच्या चहुबाजूने लाल रंगाचा एक घेरा लावण्यास सांगितले. तसेच लाल रंगाच्या बाहेरच सर्वांनी उभे राहावे असे स्पष्टही केले. काही वेळानंतरच पुन्हा वादळ आले. त्यामुळे इग्लूमध्ये जाण्याच्या प्रयत्नात लोपामुद्राला दुखापत झाली. तिने नेहमीप्रमाणेच बानीला यास जबाबदार ठरविले. बानीने तिला उत्तर देण्यासाठी एकेरी भाषेचा वापर केल्याने लोपा चांगलीच संतापली. तिने बानी सडकछाप भाषा बोलत असल्याचे म्हटले. त्यामुळे दोघींमध्ये जबरदस्त घमासान बघावयास मिळाले. रोहन आणि मनवीरने मध्यस्थी करीत दोघींचे भांडण सोडविले; मात्र दोघींच्या वादामुळे गौरवला टास्कच्या बाहेर पडावे लागले. त्यानंतर गौरव बानीसाठी खेळताना बघावयास मिळाला. त्याने जेव्हा बानीला आम्लेट बनवून आणले तेव्हा स्वामी ओमने तिच्यावर कमेंट केली. त्यामुळे बानीने स्वामी ओमला खडेबोल सुनावले. त्यानंतर बराच वेळ वादळ येत नसल्याने सर्व सदस्यांनी इग्लूपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. सगळे जेव्हा घरात प्रवेश करीत होते, तेव्हा लोपा आणि रोहन अतिशय मंदगतीने चालत होते. त्यामुळे मनवीरने दोघांवर कमेंट केली. मनवीरची कमेंट ऐकून रोहन चांगलाच संतापला. त्यामुळे दोघांमध्ये पहिल्यासारखीच तू तू मै मै झाली. गौरव आणि मनूने मध्यस्थी करीत दोघांची समजूत काढली. याचदरम्यान बेडरूममध्ये बसलेल्या मोनाला गौरवने म्हटले की, घरात दोन-अडीच महिने वास्तव्य केल्यानंतर मला नात्यांचे महत्त्व कळाले. मोनानेदेखील जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हटले की, मी आणि विक्रांत एकत्र बसून पूर्वीचे शो बघितले आहेत. जेव्हा तो मला भेटण्यासाठी घरात आला तेव्हा त्याची माझ्यासोबत घरात येण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे तिने सांगितले. दोघांमधील संवाद सुरू असतानाच पुन्हा वादळ आले, इग्लूमध्ये जाण्याच्या प्रयत्नात नीतिभा मागे पडली अन् त्याचबरोबर टास्कमधूनही बाहेर पडली. }}}} ">http://टास्कमध्ये सदस्यांची संख्या कमी होत असल्याचे बघताच स्वामी ओम यांनी इग्लूच्या अगदी जवळ जाऊन ठाण मांडले. त्यामुळे मनू आणि मनवीरने वेगळा डाव आखत स्वामी ओमला इग्लूच्या मध्ये जाऊ द्यायचे नाही असे ठरविले. रात्री १२ वाजेपर्यंत या टास्कसाठी घरातील सदस्यांमध्ये घमासान सुरू होते. त्याचदरम्यान मनू पंजाबीच्या वाढदिवसाचे सेलिबे्रशनही केले गेले. }}}} ">http://दुसºया दिवशी टास्क जिंकण्यासाठी स्वामी ओम स्वत:चे कपडे काढताना बघावयास मिळाले. आता ते आणखी काय लीला दाखविणार हे येत्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. }}}} ">http://