बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची धनराशी असणार आहे तब्बल २५ लाख रुपये. आता सदस्यांना त्या धन राशीतला हिस्सा स्वत:साठी मागायचा आहे. तेव्हा पुढे काय होणार हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशनचे कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात येणार आहे. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारी ही बैलगाडी आहे. आता सदस्यांचे काय धोरण असे ? कोण वाचेल? कोण नॉमिनेट होईल हे आजच्या भागामध्ये कळेल.
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला नाती बदलतात. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे घरामध्ये फारच कमी मंडळी उरली आहेत, त्यामुळे जुने मित्र – मैत्रिणी यांच्याशिवाय फार काळ हे सदस्य दूर राहू शकत नाही. कितीही भांडण, गैरसमज झाले तरी देखील ते मिटवून पुढे जाणे हे अनिवार्य असते. मेघा, सई आणि पुष्कर यांच्या मधील वाद विकोपाला गेले, त्यांच्यामध्ये बरीच भांडण झाली, मतभेद झाले, आरोप लावले गेले आणि त्यामुळे आता मेघा बरोबर असलेली पुष्कर - सईची मैत्री तुटते की काय असे वाटत असतानाच आज या तिघांमध्ये पुन्हा मैत्री होताना बघायला मिळणार आहे. या तिघांची मैत्री प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत होती. पण आज हे तिघे पुन्हा एकत्र येणार आहेत. तसेच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पर्यंत फक्त आठ सदस्य उरले होते. शेवटचे काही आठवडे आता उरल्यामुळे आता हा गेम खूप कठीण होत जाणार हे नक्कीच. या आठ सदस्यांमधून एक सदस्य काल घराबाहेर गेला. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त सात सदस्य उरले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. दर आठवड्याप्रमाणे काल बिग बॉस मराठीच्या घरामधून नंदकिशोर चौघुले यांना घराबाहेर जावे लागले. तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाई ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार? कोण सुरक्षित होणार? हे बघणे रंजक असणार आहे.