Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील 'या' कलाकारावर कोसळलं होतं मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 7:36 PM

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील हा कलाकार मोठ्या संकटातून नुकताच बाहेर पडला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनरावच्या कुटुंबावर संकट आले होते. गेल्या तीन महिन्याचा काळ कपिलच्या कुटुंबासाठी खूपच भयानक होता. 

नुकतेच फादर्स डे निमित्त कपिलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या वडिलांच्या आजाराबद्दल सांगितले होते. कपिलच्या वडिलांना कोरोना झाला होता. त्यावर त्यांनी यशस्वी मात केली. ते बरे होऊन घरीदेखील आले होते. घरी आल्यावर त्यांना वेगळाच त्रास जाणवू लागला होता. कपिलच्या बाबांच्या डोळ्याला भयंकर सूज आली होती आणि त्यासोबतच त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्यांची शुगर लेव्हल पण वाढत जात होती. कपिलच्या बाबांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्यांची सर्जरी करावी लागेल असे सांगितले. यादरम्यान कपिल घरी नव्हता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील शूटिंग बंद करण्यात आले होते. त्यामुळे मालिकांचे शूटिंग हे राज्याबाहेर होत होते. कपिल शूटिंग निमित्ताने महाराष्ट्राबाहेर होता आणि त्यामुळे त्याच घरी जाणे शक्य नव्हते.

डॉक्टरांनी जेव्हा कपिलच्या वडिलांची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी त्याचे बाबा वाचण्याचे फक्त तीस टक्के चान्स आहेत असे कपिलला सांगितले. तब्बल पाच तास कपिलच्या बाबांचे ऑपरेशन सुरू होते. कपिल भयंकर टेन्शनमध्ये होता. मात्र कपिलचे बाबा हे फायटर ठरले. त्यांनी फायटर स्पिरीट दाखवले आणि त्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले. कपिलच्या बाबांना ब्लॅक फंगस झाला होता.

आधी कोरोना आणि नंतर लगेच ब्लॅक फंगस झाल्यामुळे कपिलचे कुटुंब टेन्शनमध्ये होते. पण कपिलच्या बाबांनी कोरोना आणि ब्लॅक फंगस या दोन्ही आजारांवर यशस्वीरीत्या मात केली. 

टॅग्स :स्टार प्रवाह