'#लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार - सानिकाची लव्हस्टोरी सुरू झाली पण ही लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच सर्वेश नावाचे ग्रहण याला लागणार आहे. कारण आता सर्वेशमुळेच - सरकार सानिकामध्ये दुरावा येणार आहे असं वाटू लागलं आहे. सरकार सानिकाच्या मनात एकमेकांबद्दल हळूहळू प्रेम भावना निर्माण झाल्या आहेत.
सानिकाला सरकार आवडू लागला आहे, याची पूर्ण कल्पना पंकजा आणि सर्वेशला आहे. आता म्हणूनच सरकार - सानिकामध्ये कायमचा दुरावा यावा यासाठी सर्वेश एक डाव खेळणार आहे. आता सर्वेशची खेळी त्यावर उलटणार की खरंच त्यात सरकार - सानिका अडकणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. ट्रिप दरम्यान सानिकाला सरकारच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे हे कळत. दोघे ट्रीपवरून परत येतात आणि तेव्हाच पंकजा सानिकाला सांगते की तिचा आणि सर्वेशचा साखरपुडा ठरलाय. सानिका आणि सरकारला धक्का बसतो. हे सगळं ऐकून सरकारला वास्तवची जाणीव होते आणि तो ते स्वीकारायचं ठरवतो तर दुसरीकडे सानिकाला वाटतंय राजाने प्रेम कबूल करावे. सानिका राजाला मिठी मारते.
सानिका राजाला विचारते की तुझ्या फिलिंग सांग ज्यावर राजाने ठामपणे नकार देतो. सानिकाला सत्य स्वीकारता यावं म्हणून सर्वेशने सांगितल्याप्रमाणे राजा आता सर्वेश आणि सानिकाच्या साखरपुड्याची तयारी करण्यास होकार देतो. सरकार प्रेमाची कबुली देईल का? साखरपुडा खरंच पार पडणार का? पुढे काय होणार ? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.