BIGG BOSS 10: मध्ये दिसली करण -अर्जुनची जोडी,सनी लिओनीने बनावे 'आई' शाहरूख सलमानने व्यक्त केली इच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2017 06:29 AM2017-01-23T06:29:13+5:302017-01-23T12:25:01+5:30
बिग बॉसचा यंदाचा विकेंड का वार हा एपिसोड खूप स्पेशल ठरला, कारण पहिल्यांदाच या शोमध्ये करण-अर्जुन या जोडीने बिग ...
ब ग बॉसचा यंदाचा विकेंड का वार हा एपिसोड खूप स्पेशल ठरला, कारण पहिल्यांदाच या शोमध्ये करण-अर्जुन या जोडीने बिग बॉसच्या मंचावर रसिकांना फुल ऑन एंटरटेन केले. तसेच शाहरूख खानने सलमानसह आपले सुपरहिट ठरलेले सिनेमाचे डॉयलॉग स्पर्धकाकंडून बोलून घेत खूप मजा मस्तीही केली.विशेष म्हणजे शाहरूख आणि सलमानसह मनोरंजनामध्ये आपल्या खास अंदाजाने तडका लावला तो सनी लिओनीने.यावेळी सनीने 'रईस' सिनेमातील ''लैला मै लैला''.... या गाण्यावर डान्स करत रसिकांनाही आपल्या तालावर थिरकण्यास भाग पाडल्याचे पाहायला मिळाले. मात्र या मनोरंजनाच्या मूडमध्ये शाहरूख आणि सलमानच्या एका वक्तव्यावर मात्र रसिकही आश्चर्यचकीत झाले. नेहमी कलाकार शाहरूख आणि सलमान खानला समोर बघताच आपली एक तरी इच्छा व्यक्त करताना दिसतात. मात्र यावेळी चक्क सनी लिओनीसमोर शाहरूख आणि सलमाननेच आपली एक इच्छा व्यक्त केली.''सनी लिओनीने आमच्या दोघांची आई बनावी ''यांवर नेमके कसे रिअॅक्ट व्हावे असा प्रश्न बहुधा सनी लिओनीलाही पडला असावा.
Also Read:पाहा बिग बॉसच्या घरातील सलमान खान, शाहरूख खानचा ‘दोस्ताना’
तर त्याचे झाले असे की सनी लिओनीने बिग बॉसच्या मंचावर या दोघांसमोर 'दिवार' सिनेमातील एक अॅक्ट करण्याचा टास्क दिला होता, त्यानुसार एकाला अमिताभ बच्चन तर दुस-याला शशी कपूर यांची एक्टींग करायची होती. या दरम्यान या दोघांनीही मग सनी लिओनीची फिरकी घ्याचे ठरवले. करण -अर्जुन सिनेमातील राखी गुलजार यांनी साकारलेल्या आईचा रोल प्ले करण्यास सनी लिओनीला सांगितले.करण-अर्जुन यांनी व्यक्त केलेली इच्छेला सनी तरी कसा नकार देणार शेवटी सनीनेही शाहरूख सलमान कडून मिळालेल्या टास्कचा मान राखत आपल्या खास अंदाजाने रसिकांचे मनोरंजन केले. अशा प्रकारे कॉमेडीचा मसाला आणि डान्सचा तडका लावत हा भाग रसिकांसाठी फुल ऑन एंटरटेनिंग ठरला.